पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. जगदीशा परता लोभ नाहीं । कार्य कारण सर्व कांहीं । संसार करीत असतांही । समाधान | यत्नाप्रपंचाच्या वाढी । नानासकटें सांकडीं । संसार सांडून देश घडी । होय तेणें ॥ उत्तम पदार्थ दुसन्यास द्यावा । शब्द निवडून बोलावा । सावधपणे करीत जावा । संसार आपुला ॥ वरील उताऱ्यावरून प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे दिसतें. दुसऱ्या समासांत प्रयत्नवाद सांगितला आहे. मनुष्यानें आपले अंगीं असलेले गुण बाहेर आणले पाहिजेत तरच त्याचें चीज होणार; नाहींतर सर्व सारखे. जंववरी चंदन झिजेना । तंववरी सुगंध कळेना । चंदन आणि वृक्ष नाना | सगट होती ॥ समासाचे शेवटीं हरिकथा व राजकारण या दोन पुरुषार्थीचा मागल्या एका समासाप्रमाणें उल्लेख केला आहे. याप्रमाणे या दशकांतले पहिले दोन समास व्यावहारिक उपदेशपर आहेत व त्यांत मनुष्यानें प्रयत्न करून आपला संसार-प्रपंच करून मग परमार्थ साधावा असा सामान्य जनाला उपदेश केला आहे. • तीन समासापासून आठ समासापर्यंत पुनः निवळ पारमार्थिक निरू- पण आहे. त्यांत पूर्वी पुष्कळ वेळां आलेले निरूपण निराळ्या शब्दांनी व निराळ्या उपमांनी सांगितलें आहे. पण सर्व समासांचें सार म्हणजे सृष्टि- रचना, ब्रह्म व माया, ब्रह्म व भक्त, विवेक व वैराग्य वगैरे वेदांतपर व निवृत्तिपर विषयांचें विवरण रामदासांनी केले आहे. त्यांत एका ओवीत तत्कालीन हिंदुराजाचा उल्लेख आहे पण ते कित्येक आहेत; असे म्हटलें आहे. यावरून तो फक्त शिवाजी महाराजांबद्दलचा आहे असे खात्रीने म्हणतां येत नाहीं. मागां होते जनकादिक । राज्य करितही अनेक । तैसेचि आतां पुण्यश्लोक | कित्येक असती ॥