पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.


आम्हांला प्रत्यय आला. आह्नीं बंगल्याच्या दाराशीं येऊन रावबहादूरांची चवकशी केली. रावबहादूर आपल्या खोलींत आंथरुणावर जाऊन पडले होते. त्यांना मी आपले नांवगांव सांगून ओळख पटविली व रावबहा - दुरांनीं आमचें मनापासून स्वागत केलें. बंगल्याचें ठिकाण बरोबर ठाऊक नसल्यामुळे फार विचारपूस करीत यावें लागलें, यामुळे फार रात्र झाली असें आह्मीं रावबहादुरांस सांगितलें, रावबहादुरांचे घरी आमची जेवण्या- निजण्याची उत्तम सोय झाली हें सांगणें नकोच. परत येतांना दिवसा 'उजेड यावें म्हणजे आमची शेतवाडी व बागबागाईत पाहण्यास सांपडेल, असें रावबहादुरांनी सांगितले व मीही त्यांचे म्हणण्याप्रमाणें करण्याचें कबूल केलें. इकडल्या तिकडल्या गप्पागोष्टी झाल्यावर आह्मीं झोपी गेलों व चारपांच तासांच्या पायगाडीच्या श्रमानें दमल्यामुळे आंथरुणावर पडल्या- बरोबर निद्रादेवीने आमच्यावर अनुग्रह केला.<br.  पुढे जाण्याकरितां आहीं पहांटेस सहांच्या सुमारास उठलों व चहा- पाणी झाल्यावर बरोबर साडेसहा वाजतां रावबहादूरांचा निरोप घेऊन पायगाडीवर पाय ठेवला. आतां सकाळ झाल्यामुळे सभोवरचा प्रदेश स्पष्टपणे दिसूं लागला. ज्याप्रमाणें पुण्यापासून कातरजच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे, तसेंच येथेंहि दृष्टीस पडलें. नीरानदी सोडल्यापासून खंडाळ्याच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे. आह्मी रावबहादुरांच्या बंगल्याहून निघून वाटेला लागलों तोंच पसति- सावा मैल लागला. शिरवळपासून रावबहादुरांचा बंगला तीन मैल दूर आहे. म्हणूनच आदल्या रात्रीं आह्मांला बंगला लागतां लागेना.पणआदल्या दिवशी याप्रमाणें बरेच पुढे आल्यामुळे सातारा बरोबर पसतीस मैलच राहिला. रावबहादुरांचें ठिकाण पुणे व सातारा यांचे मधोमध आहे असे आढळून आलें. आतां पांच मैलानें आह्मांला खंडाळा घाट लागाव- याचा होता. हा सर्व भाग अगदीं खडकाळ माळरानी असल्यामुळें दृष्टीला रुक्ष व ओसाड भासे. हिरवीं शेतें कोठें कोठें अगदीं तुरळक दिसत. अर्ध्या तासाने आह्मी ४० व्या मैलाशीं आलों. येथेंच खंडाळें नांवाचें गांव लागतें व येथूनच घाटास सुरुवात होते. आपल्यासमोरच