पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट. श्रीरामवरद. समर्थस्वामी. लेख नं. १ श्रीगुरुभक्तपरायेण मोक्षश्रीयांवीराजीत विराजमान दिवाकर गोसाविं यां प्रतिकल्याणनाम्ने कृतानेक नमस्कार विनंति उपेरि तुझी पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाहालें सर्व प्रकारें विस्तारें ल्याहावें तरि श्री याचीं अज्ञाप्रमाणें वर्तावें हें उचित तेहि सुज्ञ असेत वडीलपणाची नीति जे परंपरागत उपासना स्थापना जे केलि आहे तें भजन चालावें. तेथें कल- हास कारण नाहि आपण श्रीच्या अज्ञेप्रमाणे देवाचा कार्यभाग चालुं देणें श्रीशिवथरचे घळीस आस्तां तुझांवर संतोष होउन नलनाम सवत्सरिं अज्ञा सर्वत्रांस केलि जे हा महाबळेश्वरकर आहे बुद्धिहि महावळ आहे राजद्वारि कित्येक प्रसंगी पाठवायास योग्य आसे प्रस्थान पारपत्या योग्य याच्या हस्तें श्रीचे संस्थान जोपर्यंत तो कार्य कर्तव्य वंशपरंपरेनें घ्यावें ऐसे बोलोन तुझांस श्रीनि तांबुल दिधला ते समयि तो उद्धव गोसावि व विठ्ठल गोसावि व आह्मी आणीक कित्येक समुदायि होते. अज्ञा स्मरोन अभिमान अक्रोध होऊन भजनास प्रवर्तल्यानें श्री दया करितिल तुझीं धैर्य न टाकणे यांच्या कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेसि अंतर पडे ऐसें न करणें त्यांचा संतोषरूप आशिर्वाद आसे. सर्वहि यश देतिल राजेश्री उद्धव गोसावी यांसहि पत्र लिहिलें आसे त्या वरून विदित होईल. आम्हींहि लवकरच येतों बहुत काय लिहिणे धैर्य श्रीभजनाचें न टाकणें हे विनंति. ●