पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ सज्जनगड व समर्थ रामदास. यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरवंत । पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥ आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील । सर्वज्ञपणें सुशील । सर्वोठायीं ॥ घीर उदार सुंदर। शूर क्रियेशि तत्पर । सावधपणेंचि नृपवर । तुच्छ केले ॥ तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं । ब्राह्मणस्थानें विघडिली। सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला || देवधर्म गोब्राह्मण । करावयासी रक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥ उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक | तुमचे ठायीं ॥ या भूमंडळाचे ठायीं। धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुझांकरितां ।। आणखी कांहीं धर्म चालती। श्रीमंत होऊनि कितेक असति । धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥ कितेक दुष्ट संहारिला । कितेकांस धाक सुटला । कितेकांसि आश्रय जाहला । शिव कल्याण राजा ॥ तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें । ऋणानुबंधे विस्मरण जहालें । वा काय नेणुं ॥ सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुझां प्रती । घर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥ उदंड राजकारण नटलें । तेथें चित्त विभागले । प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥ या पत्राचें उत्तर त्याच शिष्याबरोबर पाठवून शिवाजी चाफळास आले. व तेथून शिंगणवाडीचे मारुतीजवळ गेले. शिवाजीचें पत्र आणि शिवाजी बहुतेक बरोबरच पोंचले. शिवाजीची व रामदासांची तेथे भेट झाली व शिवाजीनें अनुग्रह मागितला. कल्याण गोसाव्याच्या सम्मतीनें रामदासांनी