पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.


जुना पेशव्यांचा कातरजचा तलाव आहे; व तेथून पुण्यांत पाणी आणिलें आहे. सहा मैलांपासून ८ मैलांपर्यंत म्हणण्यासारखा चढाव नाहीं. आठ मैलांपासून अकरा मैलांपर्यंत मात्र सारखा घाटाचा चढाव आहे व कांहीं ठिकाणीं तर तो बराच कठीण आहे. नवव्या मैलाच्या जवळ आम्ही कसेबसे आलों, व तेथून वर चढण्यास एक पाऊलवाट आहे व तिनें गेल्यास एक मैलाचा हिसका वांचतो, हें मला ठाऊक होतें म्हणून आम्ही पायगाड्या हातांत घेऊन ती पाऊल- वाट पायीं चाललों. असें करतांना आपलेच वाहन आपल्या खांद्यावर घेण्याचा केव्हां केव्हां प्रसंग येतो; तसा आमच्यावरही आला. हा कातर- जचा सर्व घाट उत्तम बांधलेला आहे व यंदा पाऊस खूप पडल्यामुळें जिकडेतिकडे हिरवीगार झाडे व शेतें दृग्गोचर होत होतीं. यामुळे सभो- वारचा देखावा दृष्टिमनोहर दिसत होता. १० मैलांपर्यंत आम्ही पाय चाललों, तोंच घाटांतल्या सर्वात उंच टेकडींत असलेला बोगदा दिसूं लागला. येथपासून एक मैल चढाव आहे; पण फार बेताचा आहे. शेवटीं एकदाचे आम्ही बोगद्याशीं आलों; परंतु सर्व घाटाचा चढाव चढून आल्यामुळे फार दम लागला व तहानही फार लागली, म्हणून तेथें अस- लेल्या पब्लिक वर्कसच्छा स्टोअरमध्ये गेलों व तेथील कारकुनाजवळ पाणी मागितले. त्याने बोगद्यांतील टाक्याचें स्वच्छ व गार पाणी आणून दिलें व तें आम्हीं यथेच्छ प्यायलों. या जलपानाने आमचा थकवा पार नाहींसा झाला व आह्मांला पुढे जाण्यास हुरुप व हुशारी आली. आतां आमच्या आजच्या पुढच्या प्रवासांतील पुष्कळ भाग उताराचा व निवळ सपाटीचा होता. यामुळेही मनाला आनंद होत होता. परंतु घड्याळांत पाहतां सहा वाजले. ह्मणजे या दोन तासात आमचा प्रवास ताशीं सहा मैलच पडला व पुढे तर रात्रीपर्यंत आह्मांला आणखी वीसएकवीस मैल जावयाचें होतें, ह्मणून आह्मी पायगाडीवर पाय टाकला व बोगद्यांतून जाऊं लागलों. हा बोगदा जवळजवळ दोन फरलांगांचा आहे. याच्यामध्ये रात्रीचे दिवे लावतात. बोगद्याच्या या टोकापासून दुसऱ्या टोकाचा उजेड दिसतो. पण बोगद्याच्या मध्ये अगदी अंधार असतो व पायगाडीच्या खालींवर