पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. २५ बाजूस उभे राहून डाव्या हातांत पाण्याचा तांब्या धरावा. उजव्या हाताने प्रथम पाटावर सांडलेले उष्टें खाली लोटून द्यावे, व डाव्या हाताने तांब्यातले पाणी पाटाच्या लांबीवर थोडथोडे टाकावें. उजव्या हाताने ते पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरवावें. याप्रमाणे सगळे पाट धुऊन झाले झणजे दोन्ही हातांनी जोडीजोडीने ते उचलून त्यांच्या योग्य जागी उभे करून ठेवावे. १२ चांदीची भांडी जेवणांत असतील तर ती अगोदर उचलून लागलीच घासून पुसून ठेवावी, किंवा योग्य माणसाच्या स्वाधीन करावी. जर जेवणारी मंडळी पुष्कळ व बाहेरची अनोळखी असतील तर ही भांडी मंडळी उठल्याबरोबर अगोदर उचलावी. नाही तर त्या गडबडीत एखादे भांडे गहाळ होण्याची भीती असते. १३ पानांतून कालवून, चिवडून किंवा मोडून तोडून खराब न केलेले असें, चांगले अन्न उरलेले असेल तें उष्टे अन्न खाण्यास ज्यांना हरकत नसेल अशांना, किंवा भिकाऱ्यांना अथवा भंग्याला देऊन टाकावें. १४ अन्न ह्मणण्यासारखें उरले नसल्यास जेवलेल्या पत्रावळी व द्रोण तशाच एकीवर एक ठेवून व उचलून केराच्या हौदीत टाकाव्या. या पत्रावळी उचलून नेतांना त्या मध्येच मोडल्यामुळे किंवा बाजूस लागलेले खरकटें गडबडत जाऊन खाली सांडण्याचा संभव असतो. याकरितां अशा पत्रावळी परातीसारख्या मोठ्या रुंद भांड्यांत किंवा ताटांत भरून न्याव्या. ताटें वाट्या असल्यास त्यांतील अन्न-पातळ व घट्ट-वेगवेगळे उष्टयांतल्याच वाट्यांतून किंवा निराळ्या भांड्यांत एकत्र करावें. ( ह्मणजे आमटीत आमटी, भाज्यांत भाज्या, कढींत कढी याप्रमाणे ) आणि ते अन्न गुरे किंवा कुत्री यांस चारण्या