पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. ८ ज्याचा व आपला पंक्तिव्यवहार नाही, पण ज्याचा स्पर्श झाला असतां विटाळही मानण्यात येत नाही अशाचे उष्टें सोंवळ्याने काढू नये. ज्याच्या स्पर्शाने विटाळ झाला असे मानण्यात येते अशाचें उष्टे काढण्याचा प्रसंग आला असता ते काढल्यावर, जशी चाल असेल त्याप्रमाणे, नवें वस्त्र नेसावे अथवा स्नान करावें. ९ उष्टयास हात लावण्यापूर्वी बिनउष्टें सामान में कामाकरितां किंवा उपचार ह्मणून जेवतांना घेतलेले असते. ते प्रथम उचलावें. जसें-टेकावयाचे पाट, समया, उदबत्त्यांची घरे, शेगड्या, गडवे, झाऱ्या, फडकी किंवा हात पुसण्याचे रुमाल, गंधाची तबकडी किंवा वाटी, गंध लावण्याची साखळी वगैरे. १० बारीक चीजवस्त ( जशी नथ ), कडोसरीचा पैसाअडका, तपकिरीची डबी, दक्षिणेचा पैसा, अंगावरची शाल किंवा पामरी वगैरे कोणाचे पानापाशी राहिलेले आढळून आल्यास ते नीट उचलून ठेवावे व ज्याचे त्यास द्यावें. - ११ बसण्याच्या पाटांचे * पुढील अर्धे भाग जागच्याजागीच धुऊन मग ते पाट उचलावे. या पाटांवर क्वचित् उष्टें सांडलेलें असते. मुलांच्या पाटावर तर हटकून असते. ह्मणून असे पाट धुण्याचा परिपाठ आहे. पाट धुण्याचा प्रकार-पाटाच्या मागील

  • बसावयास चौरंग किंवा आसने ही घेतात. चौरंग उचलण्याची व धुण्याची रीत पाटाप्रमाणेच आहे. आसन दर्भाचे किंवा गवताचे असेल तर तें झटकून त्यास पाण्याचा हात लावण्यास हरकत नाही. लोकरीचे किंवा केसाचें आसन असेल तर ते फारच हलक्या हाताने झटकाव. वाचत् काल खार सात अडकून बसले असेल तर ते काढून टाकुन तेवढ्याच भागाला पाण्याचा स्पर्श करावा.