पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २०१ mm aamana अपरिमित हल्ले होतात. आणि ह्याच दोन वर्षांत कांहींना कांहीं कारणाने त्यांचे अतिशय मृत्यु होतात. ह्मणून एकंदर शैशवावस्थेमध्ये पहिल्या दोन वर्षांत मुलाला सांभाळण्याचे काम फार नाजुक व फार जोखमीचे असते. ४ पालथे पडणें-चवथे महिन्यांत. ५ उराने सरपटणें- ६ बसणें-पांचवे महिन्यांत. ७ दांत येणे-सहावे महिन्यांत. ८ रांगणें-आठवे महिन्यांत. ९ आधाराने उभे राहणे-नववे महिन्यांत. १० आधारावांचून—दहावे महिन्यांत. ११ पाऊल टाकणे ( आधार धरून )-१२ वे महिन्यांत. १२ चालणें ( आघारावांचून )-१८ वे महिन्यांत. १३ वाचा फुटणे-१२ वे महिन्यांत. १४ बोलणे-१८ वे महिन्यांत. मूल पहिल्याने चालू लागले तर मागाहून बोलू लागते, व पहिल्याने बोलूं लागले, तर चालावयास उशीर लागतो. २ इंग्लिश मुलांविषयी इंग्रजी पुस्तकांत लिहिले आहे की, मुलाचे जन्मकाली वजन बहुधा ३॥ शेर आणि लांबी १८ इंच असते. पुढे त्याचे योग्य पालनपोषण होत गेले, तर तें मूल तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत दरएक आठवड्याला सुमारे अडीच छटाक वाढत जाते. पुढे नवव्या महिन्याच्या शेवटपर्यंत दरएक आठवडयाला दोन छटाक आणि नंतर दर आठवड्याला सुमारे दीड छटाक वाढते. टीप--वरील परिमाण युरोपियन मुलांचे आहे. आपले देशांतील मुलांची जन्मकाली लांबी सरासरी १२ इंच आणि वजन एक शेर असते व वयाच्या मानाने त्यांची वाढ होते.