पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगा स्वत:ला की तुम्ही काय काय करु शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल. जेव्हा दुसरे लोक तुमच्या गुणांची तारीफ करतात तेव्हा बरे वाटते ना, मग तुम्हीही इतरांचे कौतुक करा. उदा. आपल्या आईच्या गुणांचे, तिच्या कष्टाचे कौतुक करा. मग बघा, तिला किती छान वाटेल. जेव्हा तुम्ही स्वत: विषयी विचार करता तेव्हा चांगला विचार करा. स्वत:चा आदर करा, तेव्हा तुम्हाला छान वाटायला लागेल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होवून जाईल. जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असेल तेव्हा तुम्ही आपले दोष आणि आपल्या मर्यादा तपासायला घाबरणार नाही. जेव्हा आपल्या मनात कमी पणाची भावना असते, हीनतेची भावना असते तेव्हा छोटयातला छोटा दोष देखील आपण सहन करु शकत नाही. पण जेव्हा आपण आतून मजबूत, भक्कम असतो तेव्हा आपले दोष, आपल्या मर्यादांची चर्चा ऐकायला, पहायला आपल्याला भिती वाटत नाही. जसे खोलवर मुळया गेलेले भक्कम झाड वादळाला घाबरुन जात नाही, उखडून पडत नाही. अगदी तसंच. तुमच्या मित्रांसोबत आणि घरच्यांसोबत तुमचं सुंदर नातं असेल तर तुम्ही त्यांना प्रेमाने सांगू शकता की तुमची अडचण काय आहे, तुमचा ताण काय आहे, त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत