पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सहवेदना - करुणा आणि प्रेम - आस्था यापण सामूहिक जीवन जगताना लागायच्या. त्यातून संस्कारित - विकसित होत माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती बनायला सुरुवात झाली, मग त्याची मन प्रेरणा अधिकचे काही मागू लागली. त्यातून अवघ्या मानवजातीला कवेत घेणारा एक आदर्श प्रेम-आनंदमय समाज म्हणजेच युटोपियाचं त्याला स्वप्न पडू लागले आणि मानवी संस्कृतीची वाटचाल देवत्वाकडे म्हणजे विश्वकल्याण व शांततामय सहअस्तित्वाच्या आदर्श संस्कृतीकडे सुरू झाली..... ती मानवी अस्तित्वाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहणार आहे. ही आदर्श संस्कृती कदाचित कधीच अस्तित्वात शंभर टक्के येऊ शकणार नाही, पण ते मानवी ध्येय बनलं आहे. आपण ते ध्येय स्वीकारलं आहे. म्हणजेच मानवी षविकाराच्या महाभारतीय परंपरेकडून आदर्श रामायणी परंपरेकडे वाटचाल म्हणजे मानवी संस्कृतीची प्रगतीपर वाटचाल होय, तेच मानवी जीवन आणि संस्कृतीचे ध्येय आहे आणि साहित्याचं पण तेच प्रयोजन आहे. मानवी विकार परखडपणे दाखवीत इष्ट काय - अनिष्ट काय हे सूचित करीत साहित्यानं विश्वकल्याण आणि शांततामये सहअस्तित्वाचा उद्घोष करणे म्हणजेच महाभारत व रामायण परंपरेचा संगम साधत साहित्यनिर्मिती करणे होय. तेच लेखकाचं ध्येय व लक्ष असलं पाहिजे.
 थोडक्यात, लेखन हा फावल्या वेळेचा किंवा अर्थकारणाचा व्यवसाय नाही तर ते एक गंभीर निर्मितीचे काम आहे. मारियो वर्गास योसो या लेखकाच्या शब्दांत सांगायचं झालं तर, 'लेखन व्यवसाय हा छंद नाही की क्रीड़ा किंवा फुरसतीचा सुखद चाळा नाही. लेखन हे सर्वंकष व इतर सर्व बाबीं सोडून लेखकासाठीचा करायची तातडीचा प्राधान्यक्रम असतो, ती स्वखुशीनं पत्करलेली सुदैवी गुलामी असते. ही लेखनकामाठीची गुलामी लेखक खुशीनं को बरे करत असेल? उत्तर एकच आहे, त्यानं स्वत:ला सामान्य गरीब माणसाच्या दु:ख-वेदनेशी नाळ जोडून घेतलेली असते म्हणून !

 गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची ‘जिथं माणसाची मान ताठ असेल, मस्तक उन्नत असेल, ज्ञान मुक्त असेल आणि समाज दुभंगणाच्या भिंती नसतील' ही कविता आपण साच्याना माहीत आहेच. त्यात महाश्वेता देवीनं माझ्या स्वप्नातला भारत' या विषयी दिलेल्या एका व्याख्यानात टागोरांच्या अपेक्षांच्या यादीत आपल्याही काही अपेक्षा जोडीत यादी परिपूर्ण केली आहे. जेथे कर्ज प्रथा बंद झाली असेल, गरिबी संपलेली असेल, भूक हा शब्द उच्चारला पण जाणार नाही.....' असा भारत, असे जग असणं, भविष्यात केव्हा तरी साकार होणं, यासाठी तत्त्वज्ञानी, विचारवंत वे राज्यकत्र्यासोबत लेखक, कलावंतांनीही आपली लेखणी झिजवायला काय हरकत आहे? नव्हे ते त्यांचं नैतिक कर्तव्य आहे, त्यांच्या साहित्याचे श्रेयस व प्रेयसपण तेच आहे.....

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / १५