पान:संपूर्ण भूषण.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. -2 , पुरस्कार - - • 1 ० *ट यांनी तयार केलेला सम्पूर्ण भूषण-मराठी भाषांतर-हा ग्रंय श्रीशिवाजी-त्रिशतसांवत्सरिक महोत्सवाचे ( शके १५५१ प्रमाणे ) शुभप्रसंगी जनतेस सादर करण्याचा योग येत आहे ही गोष्ट फार आनंददायक तशीच अत्यंत उचित म्हटली पाहिजे. भूषण कवीच्या ग्रंथांकडे महाराष्ट्रांत विशेष बारीक लक्ष्य पुरविण्यात आले नाही, ही तक्रार खरी आहे. प्रो० सरकार यांनी भूषणाचे ग्रंथांविषयीं अभिप्राय ‘नो हिस्टरी नो डेटू' (जदु० तिसरी आवृत्ति) या सूत्रांत दिला आहे, या सूत्राचे दोन्ही अर्थ मिथ्या आहेत, हे या ग्रंथांतील विवेचनावरून स्पष्ट होईल, मराठी, इंग्रजी, फारसी, पोर्तुगीज, डच, वगैरे भाषांप्रमाणेच हिंदी भाषेतहि शवेतिहासरचनेस उपयुक्त असे समकालीन साहित्य आहे आणि त्याची चिकित्सा करून मिळेल तेवढी भर आपल्या ज्ञानभांडात घातली पाहिजे एवढी गोष्ट प्रस्तुत ग्रंथाच्या प्रकाशनाने स्पष्टपणे स्थापित होईल आणि हाच त्याचा ऐतिशक्षकांच्या दृष्टीने मुख्य विशेष होय. कवी, रसिक व देशभक्त यांना तर भषणाचा ग्रंथ मराठीत उतरल्याने मोठाच लाभ झाला असे वाटेल; परंतु निर्विकार असे जे इतिहासविमर्शी पंडित त्यांनाहि वर सुचविलेप्रमाणे तसाच अनुभव येईल. एतिहासिक दृष्टीने भूषणाच्या ग्रंथाची याहीपेक्षा सूक्ष्म चिकित्सा व्हावयास पाहिजे. तज्ज्ञ या संधीचा पूर्ण फायदा घेतील व यांतील उणिवा प्रकट करतील अशी उमेद आहे. रा० काटे, रा० जोशी व रा० खुपेरकरशास्त्री या त्रिवगांनी वरील कार्यारा योग्य परंभ केला आहे यात संशय नाहीं.