पान:संपूर्ण भूषण.djvu/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

--चनी १५६ -


--- सर्व राजामध्ये श्रेष्ठ व बादशहाँमध्ये वरिष्ठ अशा शिवराजांनी आज राजा होण्याची इच्छा प्रकट केली आहे; त्यामुळे फिरंगी काळजीने व इबशी भीतीनें घटकाभर देखील झोंप घेईनात. विजापुरावर कोसळलेला अनर्थ ऐकून सर्व लोक पळून गेले, आणि तिकडे दिल्ली दरबारात खळबळ उडून गेली आहे. इतकेच नव्हे, तर बलख, बुखारा व रूमशामपर्यंत ठिकठिकाणी धामधूम उडून गेली आहे. (३३) गरुड को दावा सदा नाग के समूह पर, दावा नाग जूह पर सिंह सिरताज को । दावा पुरहूत को पहारन के कुलपर, पच्छिन के गोल पर दावा सदा बाज को ॥ भूषन अखंड नव खंड महि-मंडल में, तम पर दावा रवि किरन समाज को । पूरब पछाँह देश दच्छिन ते उत्तर लौं, जहाँ पातसाही तहाँ दावा सिवराज को ।। ३४ ॥ गरुडाचा अधिकार जसा सर्वांच्या समुदायावर, शूर सिंहाचा हत्तींच्या कळपावर, इंद्राचा पर्वतराजीवर, बहिरी ससाण्याचा पाक्षगणावर, रविकिरणचा नवखंड पृथ्वीवरील अंधकारावर अखंडपणे चालतो तद्वतच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दक्षिणेपासून उत्तरेपावेतों जेथे जेथे मुसलमानी बादशाही होती तेथे तेथे शिवाजीचा अधिकार चालू झाला. (३४) दारा की न दौर यह रारि नहीं खजुवे कीं, बाँधिब नहीं है किधौं मीर सहबाल को । मठ विस्वनाथ को न वास ग्राम गोकुल को, देव को न देहरा न मंदिर गोपाल को ।। गाढे गढ़ लीन्हें और बैरी कतलान कीन्हे, ठौर ठौर हासिल उगाहत है सलि को। बुडति है दिल्ली सो संभारे क्यों न दिल्लीपति, धक्का आनि लाग्यो सिवराज महाकाल को ॥ ३५॥ ही दारावरील चढाई किंवा खजुडयाची लढाई नव्हे, अथवा मीरसहबाल ( शहाबाज खाँ ) यास धरून बांधणे नव्हे; किंवा काशी विश्वनाथ मंदिर उध्वस्त करणे किंवा गोकुळीत ठाणे बसवून केशवरायाचा वेव्हारा व गोपाळ मंदिर जमीनदोस्त करणे नव्हे. प्रचंड व दुर्गम असे किल्ले घेत