पान:संतवचनामृत.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - ६७२ ] प्रातिभश्रावणादर्श. चंद्रसूर्याहुनी तेज ते आगळे । अव्यक्ते व्यापिले अनुभवे ॥ अनुभवाची खूण गुरुगम्य जाणती । ज्ञानदेवे विनंति हेचि केली ॥. ___७०. प्रकाशास दिनमाण उणा वाटतो.. धांवत धांवत आलो नयनांजनीं । प्रकाशा दिनमणी उणा वाटे ॥ निशि दिवस दोनी नाही जेथ बारे । अर्धमात्रेवरी लक्ष ठेवीं ॥ अक्षय अक्षर क्षरविरहित साजे । ज्ञानाचे जे ओझें चालेचि ना ॥ ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी । यापरती बरोबरी नाहीं बापा ॥ ७१ चंद्रावांचून चांदणे व सूर्यावांचून तेज. चंचळ चांदिणे सोमेविण भासले । तेज निमाले रविबिंबविणे ॥ जगजीवनु म्हणे जगासि कारण । ते अणुप्रमाण तेथे दिसे ॥ बापरखुमादेवीवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला ___बाईये वो ७२. रात्रीस सूर्याचा व दिवसास चंद्राचा प्रकाश.. निशियेचे भरी भानु प्रतिबिंबी बिंबला । बिंबचि गिळुनी ठेला बिंबामाजी ।। रात्रि सूर्य वाहे दिनु चंद्र जाये। विपरीत गे माये देखियेले ॥ उदय ना अस्तु तेथे कैंचेनि त्रिगुण । आपणचि दर्पण होऊनि ठेला ॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोचि जाणे । संत तये खणे संतोषले ॥ १ सूर्य. २ चौथी अवस्था. ३ चंद्रावांचून. ४ स्वर्ग, मृत्यु, पाताळ या तिन्ही लोकांचे जीवन. ५ मार्ग आक्रमणे. -