पान:संतवचनामृत.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६६६. ६६. त्रिभुवन व्यापणाऱ्या लिंगाचा साक्षात्कार. स्वर्ग जयाची साळोखा । समुद्रपाळी पिंड देखा। शेषासारिखी बैसका । जो आंधार तिही लोकां ॥ लिंग देखिले देखिले । त्रिभुवनी तिहीं लोकी विस्तारले ॥ मेघधारी तपन केलें । तारापुष्पी वरि पूजिले । चंद्रफळ ज्या वाहिले । वोवाळिले रविदी। आत्मनैवेद्य समर्पिलें । ब्रह्मानंदी मग वंदिले । ज्योतिलिंग मग ध्याइले । ज्ञानदेवी हृदयीं॥ ६७. शीत उष्ण प्रभा हेच निराकाराचे आकारणे. महावाक्यार्थ ते कैसे बापा । सत्वर नयनी पहा आत्मप्रभा ॥ प्रभा शीत उष्ण दोहींचेहीसार।प्रणव हा सारासार आरुता रया॥ ज्ञानदेव म्हणे सोपानाते ऐसें । निराकार असे आकारेसीं ॥ ६८. सहखदळरंध्रांमधील तेज काइसयासारिखें ह्मणून __ सांगावें ? सहस्रदळ बिंदु त्यांत तेज दिसे । ते हो काय ऐसे सांगा मज ॥ जेथ नाम रूप वर्ण नाहीं बा रे। ते हे रूप बारे चैतन्य बा ॥ शानदेव म्हणे अनुभवाची खूण । जाणे तो सुजाण अनुभविया ॥ ६९. चंद्रसूर्याहून आगळ्या तेजाचा साक्षात्कार. उन्मनीसंयोगे गोसावी विराजे । चहूं देहाचे ओझे निवारूनि ॥ सोहमस्मिचे छंदे परिपूर्ण । विज्ञान हे खूण जेथे नाहीं ॥ १ शाळुका. २ वलय. ३ बैठक, ४ अलीकडचा. ५ शहाणा.