पान:संतवचनामृत.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ संतवचनामृत : एकनाथ. [६१२६ दोघां होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं। फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥ छंद पाहिजे नामाचा । निश्चयो कायामने वाचा । एकाजनार्दनी त्याचा । देव होय अंकित ॥ १२७. चतुर्भुज देवास हृदयांतच पाहिल्याने एकनाथाचा संशय फिटला. सायासाचे बळ । ते आजि जाहले अनुकूळ ॥ धन्य जाहलें धन्य जाहले । देवा देखिले हृदयीं ॥ एकाजनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥ १२८, ध्यानी, मी, शयनी एकनाथास देवाचे दर्शन. एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥ नको आणिक सायास । जाय जिकडे देव भासे भ्यानी मनी शयनी । देव पाहे जनीं वनीं ॥ अवलोकी जिकडे । एकाजनार्दनी देव तिकडे ॥ .. १२९. "जागत राम सोवत राम." गुरुकृपांजन पायो मेरे भाई । रामबिना कछु जानत नाहीं ॥ अंदर राम भीतर राम । ज्या देखो व्हां रामही राम ॥ जागत राम सोवतै राम । सपनोंमे दे तो रामही राम ॥ एकाजनार्दनीं भावही निका । जो देखो सो राम सरीका ॥ १ त्रास, क्लेश. २ लेहणे, घालणे. ३कांहीं. ४ आंत. पनिजले असता. स्वप्नांत. TEETHTT -