पान:संतवचनामृत.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० संतवचनामृत : एकनाथ. [६१२. कर्मचि खुंटले करणोंच हारपलें । अस्तमान गेले अस्तमाना ॥ जिकडे पाहे तिकडे उदयोचि दिसे । पूर्वपश्चिम तेथे कैंचाभासे ॥ एकाजनार्दनीं नित्य प्रकाशा । कर्माकर्म जाले दिवसा वंद्र जैसा॥ १२१. एकनाथाने गंगेंत बुडी दिल्याबरोबर जळांत चिन्मयस्वरूप ____दिसल्याने गंगा पावन झाली. जळ स्पर्णी जातां स्नानी । तंव चिन्मात्र भासे जीवनी ॥ कैसी वाहताहे गंगा। मानी हारपले अंगा॥ अंगत्व मुकले अंगा। स्नानी सोवळी जाली गंगा ॥ एकाजनार्दनी मज्जन । सकळ तीर्थं जाली पावन ॥ . ।१२२. स्वयंप्रकाशांत स्नान करून एकभावाने सर्व भूतांस नमन ___ करणे हीच संध्या. स्वयंप्रकाशामाजी केले असें स्नान।द्वैतार्थ त्यागून निर्मळ जाहलों॥ सुविद्येचे वस्त्र गुंडोनि बैसलो। भूतदया ल्यालो विभूति अंगीं ॥ संसारासी तीन वोजळी घातले पाणी। आत्मत्वालागुनि अध्य दिले एका भावे नमन भूतां एकपणीं । एकाजनार्दनीं संध्या जाहली ॥ १२३. एकनाथाची संध्या होऊन त्याचा संदेह गेला. झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजे आला ॥ गुरुकृपा निर्मळ भागीरथी। शांति क्षमा यमुना सरस्वती। असीं पदे एकत्र जेथे होती । स्वानुभव नान हे मुक्त स्थिति ॥ सद्बुद्धीचे घालूनि शुद्धासन । वरी सद्गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥ १ स्नान, बुडी. २ अंथरूण. ३ स्थाने. TI -- - -- - - - - - -