पान:संतवचनामृत.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

a नरहरिसोनार. १. चितारी जशी भिंतीवर चित्रे रंगवितो तसे हे सर्व जग आहे. चिताया चितरे काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे है ॥ पोरे हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा॥ तैसे जन सारे करिती संसार । मोहगुणे फार खरे म्हणती ॥ कांही साध्य करा साधुसंग धरा । नाम है उच्चारा नरहरि म्हणे॥ २. ऐरावत ज्या प्रमाणे अंकुशाच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे नरहरि गैबीनाथाच्या अंकित आहे. ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ॥ व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ॥ सर्पविष हा विखार । मंत्रवल्ली केली थोर ॥ देह जठराग्नि भारी। अन्नपाणी शांत करी॥ गुरु गैबीनाथ । नरहरिदास हा अंकित ॥ ३. नाम हे फुकाचे असून परिणामी अमृताप्रमाणे गोड आहे. नाम फुकाचे फुकाचें । देवा पंढरिरायाचें ॥ नाम अमृत हे सार । हृदयीं जपा निरंतर ॥ नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचे आगर ॥ नाम सीमध्ये सार । नरहरि जपे निरंतर ॥ त॥ १ भयंकर.