पान:संतवचनामृत.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ संतवचनामृत : सावतामाळी. [६४ कोणे दिवशी पायांचा चाकर । चालून जावें ॥ कोणे दिवशी बसून याची मन । कोणे दिवशी घरांत नाही धान्य॥ कोणे दिवशी द्रव्याचे सांठवण । कोठे सांठवावे ॥ कोणे दिवशी यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन॥ कोणे दिवशी स्मशानी जाऊन । एकटे रहावें ॥ कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा॥ कोणे दिवशी सांवत्याच्या बापा । दर्शन द्यावे ॥ ____५. देवाची सांवत्यास भेट. विकासिले नयन स्फुरण आले बाही। दाटले हृदयीं करुणाभरिते॥ जातां मार्गी भक्त सांवता तो माळी । आला तयाजवळी पांडुरंग। नामा शानदेव राहिले बाहेरौं । मळियाभीतरी गेला देव ॥ माथां ठेऊनि हात केला सावधान | दिले आलिंगन चहूं भुजी ॥ चरणी ठेऊनि माथां विनवितो सांवता। बैसा पंढरिनाथा करीन पूजा ॥ ६. नामाच्या बळाने न भितां आम्ही कळिकाळाच्या का .. माथ्यावर सोटे मारूं. नामाचियाबळे न भिऊं सर्वथा। कळिकाळाच्या माथां सोटे मारू। वैकुंठचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनि नाची रंगी॥ सुखाचा सोहळा करूनि दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा। तेणें भाक्ति द्वारा वोळंगती॥ १भरून येणे. २ सेवा करणे, आश्रय करणे.