पान:संतवचनामृत.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ संतवचनामृत : नामदेव. [६१४३ जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। कळिकाळ एका नामें महादोष जाती भंगा॥ .. दशमी एकव्रत दिंडीचे करा दर्शन । एकादशी उपवास तुम्ही करा जागरण ॥ द्वादशी साधने जळतीपातकांच्या कोटी। नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥ १४४. नाम घेतांच देव सामोरा येणार नाही तर माझे मस्तक छेदा. ___ हडबडली पातकें । घेतां रामनाम एक ॥ 'नाम घेतां तत्क्षणी । चित्रगुप्ते सांडिली लेखणी ॥ घेउनि पूजेचा संभार । ब्रह्म येतसे सामोर ॥ . नामा म्हणे जरि हे लटके। तरि माझे छेदावे मस्तक ॥ ___ १४५. बसून नाम घेतल्यास देव उभा राहतो, उभ्याने नाम का घेतल्यास देव नाचतो. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव । कोणते वैभव वाणी आतां ॥ अंत्यज आणि जातिवंता। मुखी राम घेतां उडी घाली ॥ . बैसोनि आसनी आळवितां नाम। उभा सर्वोत्तम तयापुढे ॥ ... प्रेमाचिया भरे उभ्याने गर्जतां । नाचे हा अनंत तयासवें ॥ नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी। घालीतसे उडी नेटेपाटे । १४६. नामयाचा स्वामी आला. कोटी दिवाळ्या दसरे। आम्हां हेचि झाले पुरे ॥ घरोघरी ओवाळणी । विठ्ठल देखिला नयनीं ॥ १ गोंधळून जाणे. २ साहित्य. ३ लबकर.