पान:संतवचनामृत.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१४३ ] अनुभव. १२७ १४०. डावीउजवीकडे आणि मागेपुढे तुझे चरण जोडतील असें कर. मने ध्यान करणे वाचे उच्चारणे । नयने तुज पाहणे हेचि देई ॥ करें पूजा करणे माथा चरणी ठेवणे श्रवणीं गुण ऐकणे हेचि देई । मनसा वाचा कर्म आणि दश इंद्रियें । तुझ्या चरणी दृढ होय ऐसे करी॥ डावी उजवीकडे आणि मागे पुढे। अंती चरण जोडे ऐसे करीं ॥ नामा म्हणे केशवा तुझी मज गोडी। जन्मोजन्मी जोडी हेचि देई॥ १४१. देव चहूंबाही उभा असून सर्व दिशा व्यापून राहिला आहे मन झाले उन्मन वासना तल्लीन । देखिले हरिचरण सर्वी ठायीं ॥ गुरुशिष्यमत हारपला दृष्टांत । प्रत्यक्ष त्वरित हरि झाला ॥ नामा पाहे देहीं तंव उभा चहूं बाहीं। दिशाद्रुमित दाही हरि दिसे॥ १४२. आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिलें, आंधळ्याने स्वरूप देखियेले नयनीं। मुके बहिया कानी गोष्टी सांगे ॥ कांसवीचे दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं॥ वारियाच्या लोथा बांधोनियां माथां । वांझेचिया सुताबळिवंता॥ मुंगीने त्रैलोक्य धरियेले तोडी । नामा म्हणे पिंडी प्रचित आहे ॥ १४३. सहस्रदळांतून उठणाऱ्या अनाहतनादाच्या गजराने पातकें . कपार्टी रिघतात.. सहस्रदळांमधून अनुहात ध्वनि उठीं। नामाचेनि गजरे पातके रिघाली कपाटीं। १ काढणे. २ मोट. .