पान:संतवचनामृत.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१२७] संतमहिमा. .१२१ नाही देहस्फूर्ति जातिकुळभेद । अखंड आनंद ऐक्यतेचा ॥ नामा म्हणे त्याचे चरणरज व्हावें । हेचि भाग्य द्यावे केशिराजा॥ १२५. जो मला राम प्रत्यक्ष दाखवील त्याचे मी पाय घरीन. मंत्रतंत्र दीक्षा सांगतील लक्ष। परि राम प्रत्यक्ष न करी कोणी॥ प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय। आणिकांची काय चाड मज॥ सर्व कामी राम भेटविती माते । जीवभावे त्यांते ओवाळीन ॥ नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला । सोइरा भेटला अंतरींचा। १२६. सद्गुरु नानाप्रकारे साक्षीला पाहिजे. भक्तीविण मोक्ष नाही हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥ तरी तेचि ज्ञान जाणायालागुनी । संतां वोळगोनि वश्य कीजे ॥ प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला। पाहिजे साक्षीला सद्गुरु तो॥ नामा म्हणे सेवा घडावी संतांची। घ्यावी कृपा त्यांची तेंचि शान॥ १२७, नाम जरी स्वतःसिद्ध असले तरी सद्गुरुवांचून वर्म हाती येत नाही. .. करितां वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश नये हातां ॥ बहुत व्युत्पत्ति पुराण । व्यर्थ ते स्मरण नाम नव्हे ॥ अनंत हे नाम जयांतूनि आले। त्यांतचि जिराले जळी जळ ॥ सद्गुरु ते नाम सद्गुरुकृपेंविण कोणा । साधन साधेना जपें तपें॥ नामदेव म्हणे स्वतःसिद्ध नाम । गुरूविण वर्म हातां नये ॥