पान:संतवचनामृत.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० संतवचनामृत : नामदेव. [६१२१ साधुपाशी देव कामधंदा करी । पीतांबर धरी वरी छाया ॥ नामा म्हणे देव इच्छी संतसंग । आम्हां जिवलग जन्मोजन्मीं ॥ १२२. तूं संतांचा प्रसाद सेविशील तर तुझे आयुष्य दुणावेल. संतांच्या चरणा द्यावे आलिंगन । जीवें निंबलोणं उतरावे ॥ तेथे तूं निश्चळ राहे माझ्या मना। मग तुज यातना न होती कांही संतांचे द्वारींचा होई द्वारपाळ । तुटे मायाजाळ मोहपाश ॥ संतांचे प्रसाद सेविसी उरले । आयुष्य सरले दुणावेल॥ नामा म्हणे संत आहेत कृपासिंधु । देती भक्तिबोधु प्रेमसुख ॥ ___ १२३. " तैसा भेटे नारायण संतसंगे." परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगे। कीटकी ध्यातां भृग झाली तोचि वर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगें। वनस्पति परिमळुचंदन झाला जाण । तैसा भेटे नारायण संतसंगे। अग्नीस मिळे ते न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥ सरिता ओघ जाय सिंधूसि मिळून । तैसा भेटे नारायण संतसंगे। नामा म्हणे केशवा मजदई संतसंग। आणिक कांहीं तुज न मागे बापा॥ १२४. ज्याने तुला पाहिले त्याचा चरणरज मिळाल्यास मी आपल्यास धन्य समजेन. ज्याचिया रे मने देखियेले तुज । त्याची लोकलाज मावळली ॥ नाहीं तया क्रिया नाहीं तया कर्म । वर्णाश्रमधर्म सुखदुःख ॥ १ उतरून टाकण्याचा पदार्थ. २ दुप्पट होईल. ३ किडा. ४ भुंगा.