पान:संतवचनामृत.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२. नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. राखीन मी नांव तुझे सर्वभावें । चित्त वित्त जीव देईन पार्टी ॥ जरी देवा हीन म्हणशील मज । नामा म्हणे लाज येइल कोणा ॥ १८. चंद्रानें चकोराचा सोहळा पुरविला असता त्याच्या । कळा न्यून होतील काय ? तुझे प्रेम माझे हृदया आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥ कशासाठी शीण थोडक्याकारणे । काय तुज उणे होय देवा ॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती। नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । हृदयकमळी स्थिर राहे ॥ १९. चातकाची तहान जळधाराने पुरविली असतां तो रिता होईल काय ? तुझे रूप माझ्या दाखवीं मनाते । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥ कां मज शिणविशी थोडियाकारणे। काय तुझे उणे होईल देवा। चातकाची तहान पुरवी जळधर। काय त्याचे सरे थोरपण॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती॥ कूर्मी अवलोकी आपुलिया बाळा । काय तिच्या डोळां दृष्टि नासे॥ नामा म्हणे देवा तुझाचि भरवंसा। अनाथा कोवसा होसी तूंचि।। २०. तूं माझी कुरंगी असून मी तुझे पाडस आहे. डोळे शिणले पाहतां वाटुली । अवस्था दाटली हृदयामाजी ॥ तूं माझी जननी सरसीये सांगातिणी । विठ्ठले धांवोनि देई क्षेम ॥ तूं माझी पक्षिणी मी तुझे अंडर्ज । क्षुधै पीडलो मज विसरलीसी॥ १विसरणे. २ मेघ. ३ कांसवी. ४ माश्रय, आधार. ५ वाट, ६ पिल्लू. --