पान:संतवचनामृत.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... संतवचनामृतः नामदेव.. ६१३ आर्त आर्त म्हणती माते । आर्तपरायण म्हणती तूते ॥ नामा म्हणे ऐके सुजाणा । नाइकसी तरी लाज कवणा । १४. मला येथे तुजवांचून कोणी नाही. तुवा येथे यावे की मज तेथे न्यावे । खेती माझ्या जीवे मांडियेली। माझे तुजविण येथे नाही कोणी । विचारावे मनी पांडुरंगा ॥ नामा म्हणे वेगी यावे करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं। । १५. तुझे अमृताहून गोड नाम माझे वाचेस का येत नाही ? अमृताहूनि गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा कां बा नेघे ॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासी नये तुझे ॥ कीर्तनी बैसतां निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा । हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती। नये माझ्या चित्तीं नामा म्हणे १६. मजकडून प्रपंचास मिठी घालवून तूं स्वामिद्रोह करवितोस. उलिसा प्रपंच परि हा लटिकाँ। तेणे तुज व्यापका झांकियेलें ॥ तैसियाच्या मज घालोनियां खेा। स्वामिद्रोही देवा करिसी कैसा॥ मेरूचिया गळां बांधोनि मशंक । पाहासी कवतुक अनाथनाथा ॥ नामा म्हणे देवा कळली तुझीमाव।माझा मी उपाव करीन आतां॥ १७. जरी वेडें मुकें झालें तरी मुलाचे हित जनकास __करावेच लागते. अपत्याचे हित कीजे त्या जनके । जरी वेडे मुकें झालें देवा ॥ तैसे मी पोसणे तुझे जिवलग । अंतरींचे सांग गुज काहीं॥ १ सुज्ञाना. २ खेद, उत्कंठा. ३ आरंभणे. ४ येवढासा. ५ खोटा. ६ मिठी, आलिंगन. ७ चिलट, ८ माया. ९ पोसावयाचे मूल, १० आवडते.