पान:संतवचनामृत.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ संतवचनामृत : नामदेव. [६३ गैनीनाथे गुज दिले निवृत्तीला । निवृत्तीचा झाला ज्ञानदेव ॥ शानदेवी बीज वाढलेसे जनीं । तेंचि आम्ही तुम्ही संपादिले ॥ म्हणे मुक्ताबाई तिहीं लोकी ठसा । नामदेव ऐसा राहिला कां ॥ । ४. गोयाकुंभारास बोलावणे. गोरा बोलाविला जुनाट पैं जुना । हाती थापटणे अनुभवाचे ॥ परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं। वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥ सोहंशब्द विरक्ति उरली अंतरीं। पाती अणुभरी पाहिले पण ॥ म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण । जाऊं द्या शरण अव्यक्तासी॥ ५, नामदेव हे केवळ कच्चे मडकें. जव्हारियापुढे मांडियेले रत्न । आतां मोला उणे येईल कैसे ॥ तैसे थापटणे पारखियांचा हात । वाफ झाल्या घात वायां जाती। प्रथम थापटणे हाणिले निवृत्तीच्या माथां । डेरा झाला निका परब्रह्म ॥ तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर । आतां कैचे कोरे उरे येथे ॥ तेंचि थापटणे सोपानाचे डोई । यांत लेश नाहीं कोरे कोठें ॥ तेचि थापटणे मुक्ताईला हाणी । अमृत संजीवनी उतो आली ॥ तेचि थापटणे नामदेवावर । डोई चोळू मोहेरे रडौ लागे॥ गोरा म्हणे कोरा राहिलागे बाई । शून्यभर नाही भाजिले कोठे॥ ६. संतमंडळी हो एक कैकाड्यांची सभाच आहे. संतसमागम फळलारे बा मला। सन्मानाचा झाला लाभ मोठा ॥ अतिथि आदर केला मुक्ताबाई । लांकडाने डोई फोडिली माझी ॥ १ प्रसिद्धि. २ विस्तारणे, ओलावणे. ३ परीक्षक, मर्मज्ञ. ४ योग्य, खरोखर. ५ प्यादें.