पान:संतवचनामृत.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म नामदेव. १. नामदेवचरित्र. . १. बाबाजी ब्राह्मणाने लिहिलेले नामदेवाचें जन्मपत्र. माझे जन्मपत्र बाबाजीब्राह्मणे । लिहिले त्याची खूण सारु ऐका॥ अधिक ब्याण्णव गणित अकराशते । उगवतां आदित्य रोहिणीसी शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्सर शालिवाहन ॥ प्रसवली माता मज मळसूत्रीं । तेव्हां जिन्हेवरी लिहिले देवें॥ शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाममंत्र खुणा वाचुनी पाहे ॥ ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धि ॥ २. तुळस कुश्चळ भूमीवर उगवली तरी तिला अमंगल ह्मणतां येणार नाही. कुश्चळ भूमिवरी उगवली तुळसी। अपवित्र तयेसी म्हणों नये ॥ कार्कविष्ठेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥ दासीचिया पुत्रा राज्यपद आले । उपमा मागील देऊं नये ॥ नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊ नये॥ । ३. मुक्ताबाईच्या मते नामदेव कोरा राहतो. चौदाशे वरुषे शरीर केले जतन । बोधाविण शीण वाढविला ॥ नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासी दोष लावियेला ॥ स्वहिताचे कारण पाडियेलें जेव्हां। शरण आला तेव्हां अलंकापुरी १ अपवित्र, माळण. २ कावळ्याची विष्ठा.