Jump to content

पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
संतति-नियमन

रचना फार गुंतागुंतीची असून पृष्ठस्थ भागांपेक्षां अंतस्थ भागांचें कार्यच अधिक महत्त्वाचें आहे. शिवाय गर्भधारणेशी प्रत्यक्ष संबंध पुरुषापेक्षां स्त्रीच्याच जननेंद्रियाचा अधिक निकटपणें येतो. या दोन्ही कारणांसाठी पुरुषाच्या जननेंद्रियाची चर्चा न करतां स्त्रीच्या जननें- द्रियाच्याच निरनिराळ्या भागांच्या रचनेविषयीं आणि त्यांचे विविध व्यापार कसे चालतात त्याविषयीं आम्ही विवेचन करणार आहोंत. हें विवेचन महत्त्वाचें आहे. कारण ब्रह्मचर्याचा मार्ग व्यावहारिक आहे किंवा नाहीं या प्रश्नाचा निकाल लावण्यास आपल्याला या विवेचनाचीच मदत घ्यावयाची आहे.
 स्त्रीच्या जननेंद्रियाचे कांहीं विभाग पृष्ठस्थ असून बाकीचे अंतःस्थ असतात. त्यांपैकीं अंतःस्थ विभागांचेंचं महत्त्व अधिक आहे. त्या विभागांत (९) अंडाशय, (२) अंडवाहिनी नलिका, (३) गर्भाशय, आणि (४) योनिमार्ग येवढ्यांची गणना होते. पृष्ठस्थ विभागांत (१) कला, (२) बृहदोष्ठ, (३) योनिलिंग आणि (४) मूत्रमार्ग इतक्यांचा अंतर्भाव होतो. समोरच्या पानावर दिलेल्या आकृतीवरून या सर्व विभागांचा स्पष्ट बोध वाचकांस होईल.
 आतां या अंतःस्थ व पृष्ठस्थ विभागांचें मुख्य कार्य कोणतें असतें त्याचा क्रमशः विचार करूं.
 अंडाशयः - - जननक्रियेशीं या अंडाशयांचा फारच निकट संबंध आहे. कारण पुरुषाच्या सूक्ष्मबीजाकडून स्त्रीचें जें सूक्ष्मांड सुफलित झाल्यामुळे गर्भधारणा होत असते, त्या सूक्ष्मांडाची उत्पत्तिच मुळीं या अंडाशयांत होते. अंडाशयांच्या अभावी संतति उत्पन्न होणें शक्यच नाहीं. प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी दोन अंडाशय असतात, व ते तिच्या गर्भाशयाच्या एकेका बाजूला एकेक असे असतात. गर्भाशय ज्या अनेक मांसल तंतूंच्या पट्ट्यांवर आधारलेला असतो त्यांतच हे अंडाशय बसविलेले असतात. त्यांचा रंग फिकट