पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनाचें अगत्य

१९

 कोणत्याही प्राणिजातीची उत्पादनक्षमता अशी असली पाहिजे कीं, तीमुळे ज्या विशिष्ट परिस्थितींत ती असणार त्या परिस्थितींत तिचें संख्याबल जसेंच्या तसें कायम राहील, व ती नाश पावणार नाहीं किंवा उगीचच्या उगीच संख्येनें फुगणार नाहीं. विकासवादा- ची स्थूल कल्पना ज्याला आहे त्याला हें चटकन पटेल. पण याचाच अर्थ असा होतो, की कोणत्याही प्राणिजातीच्या ठिकाणचा 'जीवना- ग्रह' ( vitality ) आणि त्या जातीचा उत्पादनवेग या दोहोंचें नेहमी व्यस्त प्रमाण असतें. म्हणजे एखाद्या जातीचे जंतू दोन घटका जिवंत राहून मरणारे असे असले तर त्या जंतूंची उत्पा दनक्रियाही अतिशय वेगाने चालत असते, आणि अशा क्रमामुळे त्या जंतूंची जाति नामशेष न होतां तिची परंपरा कायम टिकते. उलट एखाद्या जातींतील प्राण्यांचें स्वाभाविक आयुष्य बरेंच दीर्घ असले व त्यांची उत्पादनक्रियाही वेगाची असली तर थोड्याच अवधीत ती एकच जाति प्रमाणाबाहेर संख्येनें फुगेल आणि इतर प्राणिजातीस तें एक संकटच उपस्थित होईल. ही आपत्ति टाळण्यासाठी निसर्गानें अशी खुबीची योजना केली आहे, की अशा दीर्घायुषी प्राण्यांची उत्पादनक्रिया त्या मानानें मंद असावी. म्हणजे जसजसें मृत्युसंख्येचें प्रमाण कमी कमी होईल तसतसें जन्मसंख्येचें प्रमाणही कमी कमी व्हावें, अशी निसर्गाची व्यवस्था आहे. हा निसर्गनियम स्पष्ट करतांना डार्विन या शास्त्रज्ञानें आपल्या 'प्राणिजातींचा उगम' ( Origin of species) या ग्रंथांत असें उदाहरण दिले आहे, की 'कॉडर नांवाचा पक्षी ज्या अवधींत दोनच अंडी घालतो तेवढ्या अवधीत शहामृग वीस घालतो, तरी शहामृगापेक्षां काँडर पक्ष्यांचीच संख्या पहावी तों ती इतर किती तरी जातींच्या पक्ष्यांहून अधिक असल्याचें आढळून येतें. एखाद्या पक्ष्याने खूप अंडी घालणें याचा हेतु इतकाच दिसतो की त्या पक्ष्याच्या जातीचा मृत्यूकडून