पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
संतति-नियमन

गेले त्याचा सूक्ष्मपणें अभ्यास करून त्याने देशाच्या शारीरिक व मानसिक तेजाचा आणि तेथील जन्ममृत्यूच्या प्रमाणाचा संबंध जोडतां येण्यासारखा आहे, असें सिद्ध केलें. रूबिनचा सिद्धान्त असा आहे, की 'कोणत्याही देशाच्या मृत्युसंख्येच्या प्रमाणाचा वर्ग घेऊन त्याला जन्मसंख्येच्या प्रमाणानें भागिलें म्हणजे जो विभाग येईल तो त्या देशाच्या अंगच्या तेजाचा दर्शक समजावा. '
 रूबिनचा हा सिद्धान्त तो म्हणतो तितका खरा ठरेल किंवा नाहीं ही गोष्ट निराळी. लोकसंख्येसारख्या विषयांत गणिताचा कांटेतोल- पणा पतकरून हिशोब करतां येईल किंवा कांहीं सिद्धान्त मांडतां येतील किंवा नाहीं याविषयी शंका वाटणें साहजिक आहे. परंतु रूबिनच्या गणिताचें पूर्ण सत्यत्व मान्य न केलें तरी इतकें आपल्या- ला कबूल केलेच पाहिजे, कीं बहुप्रसवितेमुळे मृत्युसंख्येचें प्रमाण वाढते आणि लोकसंख्येची वाढ व्हावी त्या गतीनें न होतां अगदीं कमी प्रमाणांत होऊन सुप्रजाजननास मात्र प्रतिबंध होतो, हा प्रकार केवळ यदृच्छेनें घडत नसून त्याच्यामागें निसर्गाचाच एखादा नियम असला पाहिजे.
 अगदीं प्रथमावस्थेंतील पेशीपासून दर्जादर्जानें प्राणिजाति अस्ति- त्त्वांत येतात ही कल्पना गुणविकासवादाच्या अगढ़ी मूलसिद्धान्ता- पैकीं होय. या कल्पनेवरून हे उघड होतें कीं, खालच्या प्रतीच्या प्राण्यांच्या जीवनास जें जननप्रमाण सोयीचे असेल तें वरच्या प्रतीच्या प्राण्यांत नसेल. प्रथमावस्थेतील पेशींची उत्पादनक्रिया पाहिली तर एक पेशी थोड्याच दिवसांत लक्षावधि पेशींस जन्म देते, पण या पेशीपासून पायरी पायरीनें वरच्या प्राण्यांच्या बाबतीत विकास- वादाप्रमाणें उत्पादन क्रियेचा हा वेग कमी कमीच होत गेला पाहिजे आणि मनुष्य जर सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असेल तर त्याची उत्पादन- क्रिया सर्वोत मंद असली पाहिजे.