पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संकटाची सावली

जन्माला येतात पण मृत्यूचें प्रमाणही अगदी थोडें असल्यामुळे त्या देशाच्या लोकसंख्येची वाढ पहिल्या देशाइतकीच आहे अशी कल्पना केली, व अशा दोन देशांपैकीं अधिक चांगली स्थिति कोणत्या देशाची आहे असा प्रश्न केला तर, सारासार विचाराच्या अनुरोधानें व सर्व शास्त्रांच्या तत्त्वानुसारही दुसऱ्याच देशाचें नांव घ्यावें लागेल. हिंदुस्थानांत मृत्युसंख्येचें प्रमाण फार आहे, पण जननसंख्येचे प्रमाणही मोठें असल्यामुळे एकंदर लोकसंख्येचे प्रमाण प्रतिवर्षी वाढत आहे ही वरवर वाटते तशी समाधानाची गोष्ट मुळींच नाहीं. कारण अशा स्थितींत एकतर जगणारी प्रजा अतिशय हिणकस गुणांची असते; व लोकसंख्येची वाढ होतांना दिसते खरी, पण ती वाढ होण्यासाठीं व उरणाऱ्या प्रजेच्या कनिष्ठ आरोग्याची सुधारणा करण्यासाठीं राष्ट्राची शक्ति व संपत्ति इतकी खर्च होत असते कीं, तिकडे लक्ष दिल्यास या प्रकारांतील समाधान पार नाहींसें होऊन जातें.
 सारांश, हिंदुस्थानच्या प्रजेची सद्य:स्थिति अत्यंत शोचनीय आहे, आणि आपण वेळींच सुविचार केला नाहीं तर कालांतरानें ही स्थिति सुधारण्याचें सामर्थ्य कोणत्याही उपायांत उरणार नाहीं. मग प्रश्न असा उत्पन्न होतो, कीं हिंदुस्थानची सध्यांची 'कुप्रजा' सुधारून पुढे येणारी पिढी 'सुप्रजा' या संज्ञेला पात्र होईल अशा- करितां कोणते उपाय करण्यासारखे आहेत ?
 अशा उपायांचा विचार करूं लागल्यावर संततिनियमाचा मार्ग दृष्टीपुढे आल्याशिवाय रहात नाहीं, व हा मार्ग आचरणें श्रेयस्कर होईल किंवा नाहीं याविषयीं पूर्ण चर्चा करणे आवश्यक आहे. वाटू लागते.
 परंतु संततिनियमन हा शब्द उच्चारल्याबरोबरच कांहीं लोक एकदम बिथरून जाऊन असें विचारतील, की " अहो, पाश्चात्त्य देशांत माजलेलें हें नर्वे खूळ तुम्ही आपल्याही देशांत आतां पिक-