पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
तर लगेच डॉक्टरांना दाखवा. जर ही स्टीव्हन जॉन्सन ची लक्षणं असतील तर तो गंभीर आजार आहे.
टिपणी
१) जर औषधांच्या यादीत नेव्हिरेंपिन असेल तर सुरवात करताना पहिले १५ दिवस नेव्हिपिन दिवसातून एकदाच दिले जाते. त्यानंतर दिवसातून दोनदा नेव्हिॉपिनची गोळी दिली जाते.
२) नेव्हिपिन हे औषध चालू असेल आणि क्षयरोग झाला तर क्षयरोगाचे औषध रिफैम्पिसिन आणि नेव्हिरपिन एकत्र घ्यायची नसतात. अशा वेळी नेव्हिरपिन बदलून इफाविरेन्झ चालू करतात.

●●●

 एआरटी औषधं सुरू होऊन दोन-सव्वादोन वर्ष उलटून गेली. आता गोळ्या घेण्यात नियमितपणा आला होता. घरी गोळ्या असल्या तरी बटव्यात एका छोट्या पुडीत २ डोस ठेवायची सवय लागली होती. अचानकपणे पहाटे, संध्याकाळी बाहेर पडायला लागलं व गोळी घ्यायची राहून गेली, तरी बटव्यातील पुडीतून गोळ्या घेता याव्यात म्हणून सोय करून घेतली. ती सोय कामीही आली.

 बारक्याचं दहावीचं वर्ष सुरू होतं. घरी नाही तर निदान क्लासमध्ये तरी अभ्यास करेल म्हणून जवळच्या मास्तरचा क्लास लावला. मास्तर लक्ष घालून शिकवत होते, पण बारक्याचं लक्ष नव्हतं. मास्तरांनी सांगितलं

होतं, “पोर काही फार शिकण्यातलं नाही. दहावी पास झाला, की मग आयटीआयसारखं काहीतरी त्याला या व नोकरीला लावा. पण पहिलं दहावी पास होऊ दे.'

 शाळा सुटली, की बारक्या घरी यायचा व लगेच क्लासला जायचा. तिथून वर्कशॉपला जायचा. मग पोरांबरोबर हुंडारून उशिरा घरी यायचा.28