पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. अध्याय १ ला. कामदा. पार्वतीनला विन हारका | प्राथितों तला मी विनायका ॥ पूर्णतेस ती जाउ कामना ॥ हेच इच्छितो श्रीगजानना ॥१॥ शारदेन मी प्रार्थना करी ॥ ज्ञान गंध हा नाहिं अंतरी || मस्तकींच ह्या ठेवुनी करा ।। बुद्धि देइगे देउनी वरा ॥ २ ॥ साकी. गुल्चे चरणी ठेवुनि माथा शिवलीला मी गातों ॥ इच्छित हेतु पूर्ण करावे आशा ही मानं धरितों ।। १ ॥ श्रीधर स्वामी यांनी केला ओविबद् जो ग्रंथ ॥ त्याच अधारे श्लोक पदांनी गाइन लीला यांत ॥ २॥ पद. (हे याहो मन सुमन भृगां कमल.) या चालीवर. हे याहो महेश्वरा, त्रिपुरांतका, शंकरा, भवहारका, मयुजया, या हे या हो ।। हे याहो पुरुषोत्तमा, सुरमर्दना, श्रीवत्सलांच्छना, मधुसूदना, भक्तजन रक्षक या हे या हो ॥ १ ॥ साकी. शिव शिव उच्चारा || चकवा जनन मरण फेरा ॥ ७० ॥ गंगातीरी काशीमध्ये विश्वेश्वर तो आहे ॥ एकवार तरि दर्शन घ्याहो पाप न कांहीं राहे ॥ शिव शिव ॥१॥ ओकारामाचं ममलेश्वर तो आनंदाब्धिाहे विलसे ॥ दर्शन घेतां पाप हरूनी रूप मनची भासे || शिव शिव ० ॥ २॥