पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुवर्णसदलंकृतिर्भवति तत्र नृत्योद्यता ॥ मदीय रसनानटी रसघटी यमानंदभुः ॥ परंत अशा प्रकारची माझी कवित्व शक्ति नसतांना देखील एका उदार प्रभुच्या कृपाश्रयाने तिला चांगले उत्तेजन मिळाले हे कळविण्यास मला फार आनंद वाटतो. श्रीमंत गनश्री रामचंद्रराव गोपाळ उर्फ आप्पा- साहेब सरकार संस्थान जयखंडी ह्यांनी हा माझा उद्देश लक्षात घेऊन हैं पुस्तक प्रसिद्ध करण्याचे सर्व श्रेय आपल्याकडे घेतले व आपली शिवली. लामृतासाया पर्मपूज्य ग्रंथाविषयींची आदरबुद्धि व्यक्त करून लोकांना ईशगुणामृताचें पान करविण्याचे कामी अत्युत्तम साह्य केलें, याबद्दल मजवर त्यांचे फार फार उपकार आहेत. ह्याबद्दल श्रीमंतांचे अंतःकरणपूर्वक जेवदें अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. श्रीमंतांच्या ह्या उपकारऋणांतून मुक्त होण्यास मी असमर्थ आहे तरी नम्र चित्ताने त्या सकल चराचर जगदीशापाशी श्रीमंतास चिरायुरारोग्यादि सुखाचा लाभ मिळावा अशी माझी अनन्यभावें प्रार्थना आहे. पद्य रचनेचा हा माझा नवीनच प्रयत्न असल्यामुळे त्यांत अनेक दोष असण्याचा फार संभव आहे. तथापि वाचकांनी श्रीशंकराप्रमाणेद शिरोभागी दिलेल्या वचनान्वये गुण दोषांचा स्वीकार करून आपली कृपाबुद्धि व्यक्त करावी ही त्यांस सविनय विनंति आहे. हे पुस्तक छापून तयार होईपर्यंत माझें प्रिय मित्रांनी मला फा- रच सहाय केले याबद्दल मी त्यांचा फार उपकारी आहे. सातारा, तारीख १४ माहे मार्च सन १८९५ इसवी. वा. आ. प. ग्रंथकर्ता.