पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. गुणदोषो बुधो गृहन्निंदुवेडा विवेश्वरः ॥ शिरसा श्लाघते पूर्व परं कंठे नियच्छमि ।। शिवलीलामृत हा भक्तिरसपूरित सर्वमान्य ग्रंथ आबालवृद्धांच्या नित्य वाचनात आहे. त्याच्या योग्यतेबद्दल निराळी प्रशंसा करणे ह्मणजे चंद्रज्योत लावून चंद्र दाखविण्यासारखे आहे. ह्या ग्रंथामध्ये श्रीशंकराच्या मनोरम लीला वर्णन केल्या आहेत. तथापि त्या ओवीबद्ध असल्यामुळे त्या सर्वतोमुखीं सतत राहण्याचा संभव कमी आहे. कारण, सांप्रत- काली लोकांची मनें संगीत विषयाकडे विशेष लागल्यामुळे जिकडे तिकडे अर्वाचीन नाभ्याच्यार्याच्या शाकुंतल, सौभद्र आदि नाटकांतील शृंगारपर पद्यांचे मधुर आलाफ ऐकू येतात ! तेव्हां अशा समयीं आपल्या प्राचीन कवींच्या ईशवर्णनपर रसाळ कथांची लोकांस गोडी लागावी व अनायासें मनोरंजनच्या मनोरंजन होऊन ईश्वराचे नामस्मरण व्हावें ह्या हेतूने शिव- लीलामतास संगीत पद्यांचे रूप द्यावे अशी मला इच्छा झाली. व त्या- प्रमाणे हे पुस्तक तयार केले आहे. ___ माझ्या अल्पमतीप्रमाणे बरी वाईट पद्यरचना करून शिवकथांस संगीत पद्याचे रूप दिले; परंतु तें लोकांपुढे येणे बरेच अशक्य होते. तथापि, कविजनास उदारधी प्रभूचा आश्रय मिळाल्यास मग त्यांची काव्य- कृति प्रसिद्ध होण्यास काहीच हरकत नसते. कोणी कवीने हटले आहे.- यदि प्रभुरुदारधीः सुरसकाव्यकौतुहल ॥ स्तथैवच सभासदः सदसि सद्गुणग्राहिणः ॥