पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. आरती ( आरती भुवनसुंदराची, ) या चालीवर. ओवाळिण त्या शंकराला ॥ पार्वतीवरा त्र्यंबकाला ॥ धृ०॥ दाशार्हराजा पादं नेला ॥ पंचाक्षराचा जप केला ॥ शिव शिव छंदें व्याध गेला ॥ आली सहजी त्यावेळा ॥ । गोकर्णाचा काय महिमा ॥ प्रसन्न होउनि, देउनि टाकी, आत्मलिंग ६ दशाननाला ॥ काय हे गण ह्मणती त्याला ॥ १ ॥ .. __गजाननानें स्थापियेलें ॥ कल्माषपदा श्रुत झालें ॥ ब्रह्महत्या पापचि गेलें ॥ उद्धरुनी त्या पदि नेलें ॥ दर्शन दिधलें गोप बाळा ॥ राजपुत्र जो, धर्मगुप्त तो, संकर्टि पडला, प वुनि त्याला ॥ राज्यपद तें देशी त्याला ॥ २॥ सिमंतिनी करी स्तवनाला ॥ प्राणपती तिचा वर आला ॥ पाही भद्रा तव रूपाला ॥ भस्म लागतां असुर तरला ॥ शारदेस तो पुत्र दिधला ॥ रुद्राक्ष महिमा, ऐकनि तरला, भद्रसेन तो तसि ती नंदा ॥ निज पदि नेले बहुलेला ॥ ३ ॥ मोहिनी होई विष्णू तो ॥ भस्मासरा मग वधितो ॥ निंदुनी तुजला दक्षचि तो ॥ होमहवन तो बहु करितो ॥ पार्वति गेली अपमानिली ॥. टाकी कुंडांत, उडी त्या क्षणांत, वीरभद्र मग, वधि दक्षाला || गौरिसी मग विवाह केला ॥ ४ ॥ ___ अपर्णा विनोद बहु करिशी ॥ पणी जिंकी मग ती तुजसी ॥ रागावून तूं वनीं जाशी ॥ भिल्लिण पाहुन परत येशी ॥ श्रियाळाचे सत्व हराया ॥ अतीत होशी, मागशि चिलया, भक्षायाला, मारुनि त्याला ॥ देती पाक करुनी तुजला ॥ ५ ॥ सत्वाला पार नच ढळला || पाहुनि प्रसन्न तूं त्याला ॥ देशी मुक्तिच दोघाला ॥ महिमा गाता शेष थकला ॥ बाळकृष्ण हा दास तुमचा ॥ नमितो चरण, शरण असें मी, स्वामि कृपा- ळा, ॥ तनु कर्पूरा, समही तुजला, ॥ ओवाळिण त्या शंकराला ॥ पार्वती वरा ञ्यंबकाला ॥ १ ॥