पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा. . १०५ दिंडी अपेक्षित ते मागुनी घेइ बाळा ॥ दिलें तुजला इच्छिले याच वेळा ॥ वज्रबाहू तो पिता सुमति माता ॥ तसा पद्माकर तशिच त्याचि कांता ॥ ह्यास देई ठाव रे जगन्नाथा ॥ पार्थ भागीं ठेवि रे त्यास ताता ॥ कीर्तिमालिनि इच्छिले माग आतां । तात चित्रांगद सिमंतिनी माता ॥ तुझे जवळी राहोत शूलपाणी ॥ सदां यावे हे रूप तया ध्यानीं ॥ उभयतांनी जे काय इच्छियेलें ॥ सर्व ते मी दीधलें याच वेळे ॥ आर्या भद्रायूनें केलें, संगें घेऊन कीर्तिमालिनि ती ॥ राज्य सुखाने तेव्हां, किति वर्षे यास हो नसे गणती ॥ १ ॥ वज्रबाहु सुमती ती, चित्रांगद तो सिमंतिनी राणी ॥ स्त्रीसुतसह पद्माकर, गेले स्वर्गास बैसुनी यानीं ॥ २ ॥ भद्रायूला नेलें, कीर्तिमालिनी सहीत स्वर्गास ॥ श्रीशंकरें मग दिली, मुक्ती, ती हो क्षणांत सर्वांस ॥ ३ ॥ साकी. भद्रायूचे आख्यानाते नित्य करिति जे पठण ॥ विजयी नर ते सदा सर्वदां होइ सदां कल्याण ॥ कीर्ति दूर जाई ॥ लिहितां परम सूख होई ॥ १ ॥ हिंडी. पुण्यकारक ही कथा तुझी जाणा ॥ पद रचना तरि बिल्वदलें माना ॥ शंकराला भक्तिनें अर्पिताही ॥ भवनदीतुनि ते सहज तरति पाही ॥१॥ की कथा ही कैलासगिरी मानी ॥ करी पारायण स्मरुनि मुर्ति ध्यानीं ॥ सर्व संगहि तोडील गिरीराणा ॥ ह्मणुनि मदनारी नित्य मनी आणा ॥ २ ॥