पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ रोशन होऊन आला. दरिबा रफामत व शहामत पन्हा सिद्दी संबूल यांहीं हिम अरूज केला त्यावरून अजराहमरात कलम केले जात असे चालविलें जाईल. दरीं बाब खातर जमा देखोन कोणें बाबें शकअंदेशा दिलांत आणिला न पाहिजे. मोहिबाचे चालवावयाबायें सुभेयासही हु- कूम सादर केला असे ह्मणून कलर्मी केलें तें मालूम जाइलें ऐशास आझी कांहीं वतनदार फकीर परशरामचे नव्हो. इलाहीचे हुकुमें व बडेखान यांचे मेहेर आमचे जागा होती. ते झटलें तें आमचें चालवीत असत. याजकरितां त्यांचे सुख होतों. हल्लींही बडेखानाप्रमाणें मेहेरचे नजरेनें चालवूं ह्मणून कलमीं केलें; याहून अधिक काय आहे ? आतां यावें तर गैरहंगाम जाहला व ज्याचे बंदगी करितों तो दिलांत येऊन त्याचा हुकूम जालियावरी डोईचे वाटेनें आपले ठिकाण येऊं. मालूम जाहले पाहिजे. ज्यादा काय लिहिणें ? प्यार मोहबत मेहेरचा पन्हा फ किरावर असों दिला पाहिजे. हे किताबत.