पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३१ ● परशरामचे ठिकाणाहून वरघांटीं गेला. त्यास पांच वर्षे होत आलीं. सांप्रत ठिकाणचे ठिकाण यावयाचा मनोदय आहे ह्मणोन विनायक जोशी व कृष्णशेट शेट्ये कर्यात चिपळूण यांचे सांगण्यावरून निरोप आला. या प्रकरणी रफअत व शहामतपनाह सिद्दी संबुल यांणींही विनंति केली. त्यावरून स्नेहाच्या रीतीनें लिहिले जात असे की आपण आपले ठिकाणीं परशराम यावयाचें करून पूर्ववत् प्रमाणें सुखरूप रहावयाचें केलें पाहिजे. आल्यानंतर पूर्ववत् प्रमाणें इनामगांव आपणाकडे चालवावयाचाही हुकूम जाहला असे. सरकारांतून वडिलां- पासून आपलें चालविलें तसें हल्लींही हरएक बाबेंत चालविले जाईल. येविशीं खातरजमा राखोन कोणतेहीविशीं सरोष अंदेशा मनांत आणूं नये. आपलें चालविण्याविशीं सुभेयासही हुकूम सादर केला आहे. बहुत काय लिहिणें रवाना छ २० माहे सावान सन २१ जिलूस. हे किताबत. [ लेखांक २४२ ] केंद्रबाबा हमेषा खुपवक्त बादः - - मोहबत व मजमू इबादत मकान दोस्तान इस्तिजद्दार मखलिसान बादज दुवा सलाम खैरियत अंजाम माहवल मुराम आंके येथील कु- शल जाणून आपली कुशलता निरंतर लिहीत असले पाहिजे. यानंतर बहुत दिवस जाहले, परंतु आपणाकडून सुखरूपतेचें पत्र येत नाहीं. पूर्वीपासून आपले व आमचे थोरपणाची ममता परिपूर्ण चालत आली आहे. याप्रमाणें सांप्रतही चालावी असा आमचा मनोदय असे. १ परशरामाहून स्वामी वरघांटी आल्यास पांच वर्षे झालीं ह्मणून ह्या पत्रांत उल्लेख आहे त्यावरून हे पत्र इ० स० १७३३ सुमाराचें असावें. ह्यांत सिद्दी संबुल यांनीं विनंति केल्यावरून हे पत्र लिहिले आहे असाही उल्लेख आहे. त्यावरून वरील पत्र व हे एका वेळचेंच आहे अर्से उघड होतें. ह्या पत्रावरून सिद्दी संबुल हा जंजिन्याचा अधिपति ह्या वेळीं नव्हता असे दिसतें. ह्या वेळीं याकूदखान सिद्दी सुरूर हा जंजिन्याच्या गादीवर असावा.