पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० संबुल सलाम बादज सलाम. मुख्य तात्पर्य कारण है कीं, येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. यानंतर पूर्वी आपण हु- जूर व आझांस पत्रे पाठविलीं होतीं, त्यांचीं उत्तरें आपणांस लिहून गेल्यापासून आजपर्यंत कांहींच आपण उत्तर लिहिले नाहीं. हें स्नेहाचे ठिकाणीं योग्य नव्हे. निरंतर पत्राची वहिवाट ठेऊन मित्रतेची वृद्धि क रावी हैं योग्य आहे. ऐसीयास हल्लीं परशरामास पूर्वीप्रमाणे येऊन रहावयाचा मनोदय आहे ह्मणोन आपला निरोप विनायक जोशी व कृष्णशेट शेट्ये कर्यात चिपळूण यांचे सांगण्यावरून समजला. त्याजवरून हुजुर विनंति करून आपणास ठिकाणचे ठिकाण येण्याविशीं व पूर्वी इनामगांव आपण आल्यानंतर आपणाकडे चालवावयाचा हुकूम घे- ऊन लिहिले जात असे. व याप्रकरणीं हुजुरूनही आपणास पत्र पाठ- विले आहे. त्याजवरून समजण्यांत येईल. तरी आपण खातरजमेनें कोणतेंविशींही संशय न घेतां, परशरामीं ठिकाणचे ठिकाण येऊन सु- खरूप पूर्वीप्रमाणें राहिलें पाहिजे. आपले पूर्वीप्रमाणे अनेक तऱ्हेनें चालविले जाईल. अंतर पडणार नाहीं. या प्रकरणीं सुभे अंजनवेली- सही हुकूम सादर जाला आहे. बहुत काय लिहिणें खाना छ० २० माहे साबान हे किताबत. [ लेखांक २४१ ] हु. आजम बोंद्रबाबा महफूज बापंद. मोहबत व मवलीयत मजमु इबादत बादअज पौक आंके, बहुत दिवस जाले परंतु पत्र पाठविलें नाहीं. है स्नेहाचे ठिकाणीं नीट नव्हे. उभय पक्षींची मित्रता पूर्वीपासोन चालत आली आहे, त्याप्रमाणें सां- प्रतही उभय पक्षींचे मित्रतेचा मार्ग चालू ठेवून, पत्र पाठविण्याची वहिवाट असों द्यावी हें योग्य असे. यानंतर आपण धामधुमेचे सबनें