पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन आमचे ज्येष्ठ बंधू ती. स्व. धोंडो श्रीपाद तथा दादा नाईक यांनी दि. ८ जुलै १९९१ रोजी आपल्या वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांनी जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांत केलेल बहुमोल कार्य लक्षात घेऊन एक गौरव ग्रंथ सिद्ध करावा, अशी कल्पना पुढे आली. त्यासाठी एक गौरव समितीही तयार झाली आणि ती. स्व. दादांच्या सर्व चाहत्यांना त्यांच्याविषयीच्या आठवणी, लेख पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आता तो गौरव ग्रंथ • दादा नाईक : जीवन दर्शन' या नावाने प्रसिद्ध होत आहे. ती. स्व. दादांचे स्नेही श्री. बापूसाहेब कुलकर्णी यांची सूचना अशा प्रकारे साकार होत आहे. ( उपलब्ध झालेल्या साहित्यामुळे ग्रंथाचा विस्तारही मोठा झाला. मुळात तशी आर्थिक तरतूद काहीही नसताना ती. स्व. दादांवरील प्रेमामुळे अनेकांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले. त्यांत पुढील व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा आहे. श्री. शामराव शेळके (कोल्हापूर) श्री. रामचंद्र कृष्णाजी नवाळे (कोगनोळी), श्री. ए. जी. पै. (ठाणे), श्री. नाना शेटे (साखरपा), सौ. उषाताई देशपांडे (बेंगलोर), श्री. का. रा. गानू (धुळे), श्री. रायप्पा धनगर, श्री. दरी (कोगनोळी), प्रा. नीलकंठ पालेकर (कोल्हापूर), श्री. दिगंबर जोशी (कोल्हापूर), श्री. आर्. एस्. पाटील (कोल्हापूर), श्री. हिंदूराव घोरपडे (कोल्हापूर), श्री. व. के. महादेवकर (सांगली), नाईक कुटुंबीय (संकेश्वर, गडहिंग्लज, कोल्हापूर), श्री. बसवणप्पा कोटगी (संकेश्वर). डॉ. अविनाश शिपूरकर (कोल्हापूर) या ग्रंथाचे मुद्रण ' राजहंस प्रिंटिंग प्रेस ' चे श्री. श्री. सि. गोसावी आणि त्यांचे सहकारी यांनी अत्यंत आस्थेने व आकर्षकपणे करून दिले. आवश्यक ती छायाचित्रे श्री. सदाशिव कुरबेटी, हिदम फोटो स्टुडिओ, संकेश्वर आणि प्रकाश फोटो स्टुडिओ, संकेश्वर यांनी वेळेवर उपलब्ध करून दिली. ती. स्व. दादांच्याविषयी अनुभव / आठवणीवजा लेख अनेकांनी आवर्जून पाठविले. या सर्वांच्या सहकार्याविना हा ग्रंथ तयार झाला नसता. त्या सर्वांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. ती. स्व. दादांच्या असंख्य चाहत्यांचा हा लोभ नाईक कुटुंबियांवर सदैव राहावा, अशी विनंती आहे. - श्री. सदानंद नाईक ५ डिसेंबर १९९९ गांधी चौक संकेश्वर (जि. बेळगांव) आठ