पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादांचीही इच्छा असते. त्यातून मानवी जीवनातील गुंतागुंत उलगडणारा धागा मिळाला, तर तो हवा आहे. जीवन दर्शन ' या ग्रंथाचे संपादन करीत असताना, सतत जाणवत राहिले, की अशा अनेक थोर पण अज्ञात व्यक्तींच्या जीवनातील घटना त्या त्या वेळी जर शब्दबद्ध करून ठेवल्या, तर समाजशास्त्राच्या दृष्टीने ते एक उपयुक्त कार्य ठरू शकेल. एकूण मानवी जीवनाची वाटचाल लक्षात घेता त्यावर प्रभाव टाकणाऱ्या कार्यकर शक्ती आणि व्यक्तींची नोंद त्यामुळे होईल आणि ते समाजेतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन ठरेल. ( स्वतः ती. स्व. दादा नाईक आपल्या आयुष्यात कधीही, कुठल्याही व्यास- पीठावर मिरवले नाहीत. प्रसिद्धीची साधने व माध्यमे सहजी उपलब्ध असूनही त्यांनी त्यांचा वापर कधी केला नाही. जिथे साहाय्याची अपेक्षा आणि गरज दिसली, तिथे ते धावून गेले आणि ते सर्वांचे झाले. त्यांच्या सहवासात जे आले, ते त्यांचे बनले. ती. स्व. दादांच्या विषयीचा प्रत्ययकारी स्नेहाचा धागाच या ग्रंथातील लेखकांच्या मांदियाळीस एकत्र आणण्यास कारणीभूत ठरला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील व्यक्तींनी आपापल्या मातृभाषेत किंवा इंग्रजीत लेखन करून ती. स्व. दादांविषयीचा आपला आदरभाव व्यक्त केला आहे. भाषा किंवा प्रादेशिकतेची बंधने खऱ्या स्नेहाच्या आड येऊ शकत नाहीत, याचेच हे निदर्शक आहे. या ग्रंथातील अनेक घटना त्यांचे आगळेपण स्पष्ट करतील आणि वाचकांना अंतर्मुख बनवतील. नव्या साहित्य कृतींची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांत आहे. त्यामुळे ज्ञात आणि अज्ञात वाचकांना हा ग्रंथ आवडेल, अशी अपेक्षा आहे. १ डिसेंबर १९९१ १७३० ई, सहावी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर स्त्रात वसंत स. जोशी.