पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री कृष्ण ॥ श्री. दादा नाईक गौरव समिती संकेश्वर कोल्हापूर, महाराष्ट्र श्री शिवशक ३१७ सोमवार दि. २१-१-१९९१ शुभचिंतन, माननीय श्री. दादा नाईक यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना, माझी ही अगत्याची ओंजळ अर्पण करताना, मला मनापासून आनंद होत आहे. त्यांच्या जीवनाचे विविध पैलू रसिकांना-सन्मित्रांना- सज्जनांना आणि अध्यात्म क्षेत्रातील मंडळींना पूर्ण परिचित आहेत. विशेषतः त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी शिक्षणसंस्थाद्वारे अनेकजणांना ज्ञात आहे. शुभचिंतन ! योजीहिताप्रति निवारुनि पापकर्मे । वर्णी बोंच गुण झाकुनिया कुकर्मे ॥ दे आपणांस असता व्यसनी त्यजीना । सन्मित्र लक्षण असें वदतात जाणा ॥ शारीरिक दुर्बलता आणि डोळ्यांच्या अधूपणामुळे लिहिता-वाचता येणे अगदी अशक्य झाले आहे, तरी या चार ओळी त्यांच्या सन्मानार्थ लिहित आहे. पाल्हाळिक व्याख्यानापेक्षा भाषेच्या अवडंबरापेक्षा अंतःकरणापासून निघालेला एक शब्दही सज्जनांची खात्री करून देण्यास पुरेसा असतो. त्यांच्या हातून असेंच कार्य घडत राहो ही श्रीचरणी प्रार्थना ! भालजी पेंढारकर