पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ जर संरक्षण द्यावयाचें तर त्यांच्याकडून स्वस्त भावाची व भरपूर पुरवठ्याची आधी हमी घ्यावी, मगच संरक्षण द्यावे, असा इशारा देण्यासाठी, पूर्वीच्या लेखाचा हा दाखला पुढे केला आहे. हेतु हा की, त्या वेळी त्याकडे जसें दुर्लक्ष झालें तसे दुर्लक्ष यांवेळी होऊं नये. हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट हा शेवटचा लेख सद्यःस्थितीवरहि प्रकाश पाडणारा आहे. १९३१ साली इंग्लंडांतल्या पौंडाचा भाव घसरला आणि त्याबरोबरच भारत-मंत्र्यांनी अरेरावीने रुपयाचा भाव सोन्यांत ठरला होता तो रद्द करून रुपयाचा संबंध पौंडाशीं जोडला. यामुळे पौंडाबरोबरच रुपयाचे अवमूलन होऊन अमेरिकन डॉलर भावांत चढला आणि हिंदुस्थानला अमेरिकन माल महाग पडूं लागला. त्या वेळी ही भापत्ति पारतंत्र्यामुळे आली. आतां अलीकडे विलायतेंत ग्रैंडावर तोंच प्रसंग आला असून, हिंदुस्थान सरकारनें पौंडाप्रमाणेंच येथल्या रुपयाचे अवमूलन केले. यामुळे अमेरिकेतून माल आणविणाऱ्यांची कुचं- बणा होत आहे. अशा परिस्थितीत रुपयाचा संबंध अस्थिर अशा पौंडाशी न जोडतां रुपयाचा भाव सोन्यांत निश्चित करावा,' असें या लेखाच्या उत्तरार्धात प्रतिपादन केले आहे. हा प्रश्न बराच भानगडीचा आहे, तरी पण त्याची भवति न भवति करण्यास हा मागील लेख उपयोगी पडेल. तीन महत्त्वाच्या विभागांतील लेखांचें धोरण काय व त्यांची निवड कां केली त्यासंबंधाचें हें स्पष्टीकरण पुढील लेख वाचतांना मार्गदर्शक होईल. या तीन प्रकरणांतच ग्रंथाची ठरलेली पृष्ठसंख्या भरत आल्याने ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, परीक्षणात्मक, संकीर्ण इत्यादि लेख दुसऱ्या खंडाकरितां राखून ठेवावे लागले. मात्र केसरी पत्राचे धोरण काय, लो. टिळकांची केसरी चालविण्यांत दृष्टि कोणती होती आणि सामान्यतः वृत्तपत्रकाराने कोणतें ध्येय व धोरण आपल्या नजरेसमोर ठेवावें, यासंबंधाचे स्वतःचें मत प्रतिपादन करणारे जे दोन-तीन लेख प्रसंगानुरोधानें लिहिले होते ते शेवटी देऊन हा ग्रंथ करण्यांत आला आहे. यांतील लेख जर वाचकांना वाचनीय व संग्रहणीय वाटले तर लेखसंग्रहाचा दुसरा खंड प्रसिद्ध करण्याचा विचार ठरवितां येईल. पुणे, माघ शु. १० शके १८७१ दि. २८ जानेवारी १९५० ज.स. करंदीकर