पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध पण ते भाषण जरी धमकीचें होतें तरी स्वतः गव्हर्नरसाहेबांस सोटेशाहीचें धोरण व्यक्तिशः नापसंत असल्याने त्यांनी या कोंडींतून निसटण्यास पळवाट म्हणून चौदा दिवसांची मुदत देऊन ठेवली होती; आणि त्यांच्या इच्छेस अनुसरून त्या चौदा दिवसांत शिष्टाईचें लोण एकसारखें इकडून तिकडे जातां येतां अखेरीस अशा एका मध्यबिंदूवर तें स्थिर झाले की, त्या मुद्द्यावर उभयतांची एकवाक्यता होऊन शिष्टाई सफल झाल्याच्या आनंदाचा देखावा सर्वोस पाहावयास मिळाला. बालीच्या वादाचा आरंभापासूनच सरकारने शांत चित्तानें विचार केला असता तर हे प्रकरण इतकें भडकलेच नसते. परंतु नोकरशाहीनें प्रारंभी आपल्या नेहमींच्या उद्दाम वृत्तीने फेर-चौकशीची साधी मागणी बेमुर्वतखोरपणानें झिट- कारली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हां बाडोलीच्या शेतकऱ्यांनी सत्याग्रहा च्या पैजेचा विडा उचलला त्या वेळी टाईम्सकारांनी आगलावेपणा करून त्या सत्या- ग्रहाला बंडाचें स्वरूप देऊन ही आग भडकविली. पण त्यायोगानेंच भारतमंत्री वं व्हाइसरॉय यांचें लक्ष तिकडे वेधले आणि त्यामुळे सोक्षमोक्ष करून टाकणें भाग पडलें नाहींतर हे प्रकरण असेच धुमसत राहिले असते आणि एकदोन महिन्यांनी एकदम स्फोट होऊन भयानक भडका उडाला असता. ही आपत्ति टाळावी म्हणून सर लेस्ली विल्सन यांनी बाह्यतः जरी धमकीचा देखावा दर्शविला तरी वस्तुतः एकेक पाऊल माघार घेऊन समेटाचा रस्ता खुला करून ठेवला. एकदां सेटलमेंट जाहीर झाल्यानंतर फेर-चौकशीची मागणी करणें देखील पाप आहे असली गुर्मीची गर्जना बंद पड़न, ' चौकशी करूं परंतु ती मुलकी कामगारांकडून करवूं ' अशा आशयाची उतरत्या सुराची भाषा यापूर्वीच सुरू झाली होती. तथापि मुलकी कामगारांकडूनच चौकशी करविणे व चौकशीपूर्वी जुना-नवा सगळाच सारा भरणे या दोनहि अटी सत्याग्रह्यांना सर्वस्वी अमान्य असल्याने सरकारचा हा उतरता सूर देखील बार्डोलीकरांच्या सुराशी मिळणे अशक्य ठरलें. सिमल्याचा कानमंत्र अशा परिस्थितीत गव्हर्नरसाहेब सिमल्याहून कानमंत्र घेऊन परत आले आणि त्यांनी कायदेमंडळापुढे मोठा क्रोधाचा अविर्भाव आणून “बाडोलीकरांनी जर बादशाहाविरुद्ध बंड आरंभिलें असेल तर यत्किंचितहि दयामाया न दाखवितां आम्ही तें बंड ताबडतोब चिरडून टाकूं; परंतु जर त्यांच्या मनांत तसला बंडाचा विचार नसेल तर मग आम्ही फेर-चौकशीचा विचार करूं आणि ती चौकशी पूर्ण, उघड व स्वतंत्र होईल याविषयी काळजी घेऊं " असली जरतारी धमकी दिली ! या भाषणानंतर सरकारी कचेरीच्या पडद्याआड जी वाटाघाट झाली आणि जिचें पर्यवसान उभय पक्षांस संमत अशा समेटांत झाले ती वाटाघाट लक्षांत घेतां गव्ह- र्नरांच्या भाषणांतील धमकी ही बर्कनहेडसारख्या सोटेशाहीच्या पुरस्कर्त्यांच्या व "