पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध ऑस्ट्रियाचा किंवा रशियाचा छाप पडला असल्या कारणाने ती पद्धति हिडिस वाटते. " मोर्लेसाहेबांनी दिलेला हा मंत्र कितपत पाळला गेला आहे हे बंगाल्यां तील अटकबंदांच्या यादीवरून आणि विशेषतः नवीन होणा-या दडपशाहीच्या बिलावरून दिसून येतच आहे ! ज्या पद्धतीना मोर्ले रशियन व हिंडिस अशी नांवें ठेवतात तीच पद्धति आतां ब्युरॉकसीची आवडती बनली आहे. नुसत्या संशयावरून शिक्षा करण्याच्या पद्धतीविषयी मोर्लेना किती तिटकारा होता तो ता. १३ जानेवारीच्या त्यांच्या पत्रावरून स्पष्ट होतो. ते पत्र असें “परवांच एका गृहस्थाचे एकाला पत्र आले होते त्यांत असा मजकूर आहे की, त्या व्यक्तीची ( नांव गाळले आहे ) संघटनाशक्ति व लोकांवर वजन फार आहे आणि अत्याचाराच्या कृत्याविषयींहि त्या व्यक्तीची सहानुभूति आहे याविषयों बिलकुल संशय नाहीं. असल्या या स्वतःच्या खात्रीवरून एखाद्या इसमाला चौकशी न करतां अटकेत ठेवण्याचा सल्ला या गृह- स्थानें यावा हें खरोखरीच भयंकर आहे. संशयाचा फायदा आरोपीस दिला पाहिजे हेच तत्त्व योग्य असून तेंच आम्ही पाळले पाहिजे.” मोर्लेसाहेबांनी अधिकारन्यास केल्यापासून हें तत्त्व कितपत पाळण्यांत आले आहे हे सांगितल्याशिवायहि कळण्या- जोगे आहे. नव्या बिलांत तर या तत्त्वाची उलटापालट झाली असून संशयाचा फायदा आरोपीस मिळण्याऐवजी संशयाचा फायदा सरकारच घेऊं पाहात आहे ! गुप्त चौकशी व गुप्त फांशी - ता. ५ मेच्या पत्रांत मोर्ले लिहितात, पार्लमेंटचे १५० सभासद हद्दपारीच्या पद्धतीविरुद्ध तक्रार करण्याकरितां ॲस्क्किथसाहेबांची मुलाखत घेणार आहेत. तेव्हां यापुढें तुम्हांस हद्दपारीचें शस्त्र सोडून द्यावे लागेल हे लक्षात ठेवा. " परंतु प्रत्यक्ष अनुभव मात्र मोर्ले यांच्या अनुमानाच्या उलटच येत आहे. वरील पत्रानंतर पार्ल- मेंटांत प्रश्नोत्तरे झाली; त्यांत अपराध्याला आरोप कळविल्याशिवाय अटकेत ठेवणें आणि आपल्यावरील संशय दूर करण्याची त्यास संधि न मिळणें या दोषावर ताशेरा झाडण्यांत आला; आणि ब्रिटिशांची न्यायपद्धति व हक्क याविषयीं जी कल्पना आहे त्या कल्पनेमुळे चौकशीशिवाय शिक्षा करणे ही गोष्ट ब्रिटिशांना कधीहि रुचणार नाहीं असे सांगण्यांत आले. या ब्रिटिश टीकाकारांनी हल्लींची नवीं बिले वाचली तर त्यावर त्यांचा अभिप्राय काय पडेल बरें ! गुप्त चौकशी करून शिक्षा करण्याची कल्पना देखील मोर्लेसाहेबांना असह्य वाटत होती. कर्झन वायलीच्या खुनानंतर मदनलाल धिंग्राची चौकशी गुप्तपणे करावी अशी कोणी सूचना करतांच ते टोंचून लिहितात, “वा, गुप्त चौकशी करून फक्त फांसावर चढवावयाचें ही फारच नामी कल्पना ! " परंतु या नव्या दडपशाहीच्या दुसन्या बिलांत अथपासून इतिपर्यंत सगळा गुप्त कारभार आहे त्याला मोर्लेसाहेब कोणतें नांव ठेवणार ! (6