पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

षण साधना करण्यात मात्र त्यानी हयगय केली नाही. त्यामुळे त्याना जसजसा अनुभव येवू लागला तसतशी श्रद्धा वाढत गेली. आणि. वाढता वाढता " गुरु: साक्षात् परब्रम्ह " या अनुभवास ते जाऊन पोचले.

 परमार्थात सद्गुरुची अवश्यकता आहे. पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे गुरुदेवाना वयाच्या पंधराव्या वर्षीच अत्यंत थोर सद्गुरु लाभले आणि त्यानंतर दहा वर्षानीच त्याना आपल्या गुरुची थोर योग्यता समजली, किंवा अनुभवाला आली. ते अधश्रद्धाळू नव्हते. सर्व संतानी एकमुखानी म्हटले आहे की "गुरुवांचून आत्मज्ञान नाही". प्रो. रानडे याच मार्गाने गेल्याने त्यांचे अनुभव वाचकाना उद्बोधक वाटतील. एका व्याख्यानांत ते म्हणतात:- "सद्गुरु शिष्यासाठी काय करतात? देव आणि भवत यांची गांठ घालून देतात माणि आपण दूर राहातात." सतारीची एक तार छेडली तर दुसया तारा न छेडता आपोआप वाजू लागतात. त्याच- प्रमाणें आत्मानुभुतीचा दिव्य झणत्कार त्यांच्या ठिकाणी झणकत असतो. आणि त्यांच्या संगतीत यंगारानाही तो प्राप्त होतो. पण अना मार्गदर्शक गुरु कसा भेटणार ? आजकाल जगांत भक्तीचा आ गुरुत्वाचा वाजार चालू आहे हे आपण पाहतो आहोच. पण रामदासांच्या दासबोधाचा आधार घेऊन गुरुदेव सांगतात, "गुरुच्या अंगी असणारे कांहीं नैतिक, शारिरीक, पारमार्थिक व सामाजिक विशेष हे ते निकष होत”. तसेच “अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान व बाह्यतः निष्ठेचे भजन, निश्चयाचे समाधान, स्वरुपस्थिती, प्रवल वैराग्य, उदासवृत्ती, निर्मल आचार व अखंड परमार्थविवरण अशी सद्गुरुची लक्षणे असतात." ते पुढे म्हणतात. "गुरुचा देह म्हणजे गुरु नव्हे, तर त्याचे गुप्त रूप हा खरा गुरु. तो गुप्तरुप असतो व या गुप्तरुपाचा अनुभव आपल्या शिष्यास आणवून देतो. गुरुचे गुरुत्व त्याच्या शरीरांत नसून त्याच्या परमार्थामध्ये आहे.

 देहातीत गुरुची ही कल्पना एकदा कळली म्हणजे गुरुभक्ती विषयींचे सुशिक्षित समाजांतील गैरसमज दूर होतील. गुरुची सेवा म्हणजे गुरुच्या जड देहाची सेवा नव्हे. नेम किंवा साधन हे या

11