पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ व्हाया लाभ सुखें सदा सुलभ तो विद्यामृताचा जना । ै छोकांच्या पुरवीं यथोचित नृपा चित्तांतल्या कामना ॥ ै ते ते यत्न करूनि सर्व जनता संतुष्ट राखी सदा । 懿 भोगी राज्य-सुखा अखंड मिळवी ती शर्मदा संपदा ॥८॥ }ै दीर्घायुष्य सदैव चिंतित तुझें राही प्रजा ती मुखीं । आनंदें चिरकाल सद्गुण-निधी राजा असो हा सुखी ॥ { यांची संतति पुत्न-पौत्र-सहिता सैख्यांत नांदो सदा । आशीर्वाद असे प्रजाजन-मुखीं येवोत राया मुदा ॥९॥ राया ईशकृपं समुन्नत महा-राज्यासनीं वैससी । राज्यारोहण मंगलप्रद अशा कालीं कसा शोभसी ॥ याचे चित्र मनांत आणुनि तुझ्या त्या सद्गुणांची स्तुती। केली अल्प यथामती प्रिय असो ही त्वत्पदीं मन्मती ॥१०॥ पुण्यश्लोक युधिष्ठिरादि नृपती झाले यशस्वी जिथे । राया तूंहि तसाच होशिल अशी आशा अम्हांला तिथे। वारंवार महोत्सवीं नृपतिच्या आनंद होवो जना । निष्ठा प्रेम सदा वसो दृढ अशी ईशा तुला प्रार्थना ।।११।। : * श्रीमद्गायकवाड-वंश-जनिता मी रामचंद्रात्मजा । r नामें मात्र हिरा नृपा नमितसें सप्रेम पादांबुजा । राया मीं विनयें तुह्मांस सुमनें माला नवी अर्पिली । आहे ही तारे पाहिजे नृपवरा कंठीं सदा ठेविली ॥१२॥ e - o 部澆 CŞ cio