पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२॥ कुत्थ व दुरुप्फ योगाचे तात्पर्य, कुत्थ योगास योग झणण्यापेक्षां कुत्थ (बलिष्ठ) ग्रहाची लक्षणे, व दुरुष्फ योगास दुरुप्फ (निबळी) ग्रहांची लक्षणे झणणे बरे दिसते. करितां ज्याची लक्षणे फार असतील त्यावरून आणि तारतम्याने या दोन योगांचा निश्चय करावा. सूक्ष्म दृष्टीने पाहतां कुत्थ आणि दुरुप्फ हे दोनी योग निराळे मानण्याचे कारण नाही. ह्याचे कारण असे आहे की, कुत्थ झ० बलिष्ठ व दुरुप्फ ह्म निर्बली असा अर्थ असल्याने प्रत्येक योगांत या दोन्ही योगांचा समावेश होऊ शकतो. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पणाचा ३रा षोडशयोगाध्याय. समाप्त, श्री महालक्ष्म्यर्पणमस्तु