पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ही अडचण दूर व्हावी ह्मणून हैं "ताजिक शास्त्रोक्त षोडश योग दर्पण ( उदाहरण व तात्पर्य सहित)" नांवाचे पुस्तक रचिले आहे याच अध्याय ३ केले आहेत. १ ला संज्ञाध्याय-यांत या १६ योगोपयोगी अवश्य संज्ञेचे मूळ श्लोक त्या ग्रंथाचे नांवासहित देऊन त्याचे खाली भरपूर माहिती, कोष्टक व स्पष्टाकरणयुक्त मराठी भाषांतर दिले आहे. २रा उपकरणाध्याय-हल्ली हिंदुस्थान देशांत सर्वत्र आगगाडी सुरू आहे व तिची बहुतेक वेळ मद्रास टाईमची असल्याने इच्छित स्थळी मद्रासकालिक घड्याळावरून सूर्योदय वगैरे साधता येण्याची रीती दिली आहे. जेथे मद्रास टाईम चाल नाही अशा स्थळीही उपयोग व्हावा ह्मणून इच्छित टाईमाने घड्याळावरूत इष्टकाल साधतां येण्याचीही रीती दिली आहे. याच योगाने फार सूक्ष्म असा इष्ट काल अनायासाने साधतां यतो. त्या इष्टकालाचे दृक्प्रत्ययद गणितागत स्पष्टग्रहांस या बुकांतील संज्ञाध्यायांतील संज्ञा वगैरे मांडण्याची रीती; आणि लग्नेश व कार्यश यांचा निर्णय दिला आहे. ३रा षोडश योगाध्याय यांत प्रथम १६ योगाचे मुख्य भद् देऊन नंतर ठोकळ मानाने कोण कोणत्या योगांचा संभव आहे ह " संभवनीय योग प्रकरण " या नावाने दिले आहे. या प्रत्येक योगांचा संस्कृत मळ श्लोक त्या ग्रंथाचे नांवासहित देऊन त्याचे खाली योग समजण्यासारखे मद्देसूद प्राकृत भाषांतर, त्या योगाचे फळ, उदाहरण व तात्पर्य असें क्रमाने दिले आहे. या सोळा योगावांचन ताजिक शास्त्राधारें जन्मपत्रिका तयार करण, वर्षफळ काढणे, व प्रश्न वष्णव नीलकंठी वगैरे जे प्रश्न ग्रंथ आहेत त्यांचा फलादेशच पाहता येत नाही तो पाहतां येऊन कार्य साधन व्हावे व शास्त्राची सत्यता दृग्गोचर होण्याकारतां हे पुस्तक रचिले आहे. सौस माझी अशी विनंति आहे की, या लहानशा पुस्तकाचे अ. वलोकन करून यांतील गुणाचे ग्रहण करावे. व जे दोष असतील ते मला कृपा करून कळवावे ह्मणजे माझ्या श्रमाचे साफल्य होऊन त दाष दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी दुरुस्त करितां येतील. गणेशमा बिन बाळंभट्ट हेरलेकर. बेळगांव. शके १८२२