पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना २ ला प्रकरण हानि याचा ग्रहातील संबंधी ग्रह चाडक्यांत ज्योतिष शास्त्रावरून फळे सांगण्याचे प्रकरणास होराशास्त्र असें ह्मणतात. या शास्त्रावरून फळे पाहण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यांत इष्टकालिक ग्रहस्थिति वरून फळं पाहणे हा मार्ग उत्तम व अनुभवशीर असन शास्त्रिय दृष्टयाही बरोबर आहे. इष्टकालिक ग्रह स्थितीमध्ये जे ग्रह समर्थ (बवान ) असतील तेच आपले फळ देण्यास समर्थ असतात. इतर ग्रह असत नाहीत. यामुळे त्या ग्रहाचें फळ चु कतें. तें न चुकता अनुभव बरोबर येण्याकरितां ग्रहाचें बलाबल काढावे लागते. ग्रहांचें बलाबल काढण्याचे दोन प्रकार आहेत. १ला प्रकार-ग्रहांची सहा प्रकारची बलें आहेत ती काढून घेऊन बलाबलाचा निर्णय करणे हा आहे, परंतु यास गणिताचे उत्तम ज्ञान व काळहि फार लागत असल्याने याचा उपयोग व्हावातसा होत नाही. २रा प्रकार-इष्ट कालिक स्पष्टग्रहांतील इच्छित मनुष्यासंबंधी ग्रह आणि ज्या गोष्टीचा विचार करण असेल त्या संबंधी ग्रह कोण आहे. हैं शास्त्राधारे ठरवून घेऊन त्या दोघांचे बल व त्याचे फळ थोडक्यांत समजावे ह्मणून फक्त १६ योग सांगितले आहेत. यास “ताजिक शास्त्र" असें ह्मणतात. हैं ताजिक शास्त्र प्रथम तुर्क लोकांनी शोधून काढले. या १६ योगावरून होरा शास्त्राचा अनुभव अगदी बिनचूक येऊ लागल्यामळे हैं जरी म्लेंच्छ प्रणीत शास्त्र आहे तरी फार प्राचीन काळच्या विद्वान ब्राह्मणांनी याचा स्वीकार केला व करावा असे प्रतिपादन केले आहे. यास प्रमाण-ब्रह्मद्वेषि तुरुष्क संभवमिदं ताीयकं विद्यते. इ. तात्पर्य-ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्या तुर्क लोकांनी हे शास्त्र केले आहे तरी उत्तम ब्राह्मणांनी हे अध्ययन करण्यास योग्य आहे. असें ताजिक भूषण कर्ते गणेश दैवज्ञ यांनी लिहिले आहे. श १४८० या सोळा योगांची रचना थोडक्यांत असून ते सर्व ताजिक ग्रंथांत सांगितले आहेत. त्याचे संस्कृत श्लोक आहेत ते फारच कठिण आहेत झणन त्याजवर टीकाही आहे. तरी त्याचा उपयोग संस्कृत जाणणारांसही लवकर होत नाही मग प्राकृत जनांस तर कोठून होणार?